Uttarakhand accident| रुद्रप्रयाग टेम्पो ट्रॅव्हलर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान फंडातून मदत जाहीर | पुढारी

Uttarakhand accident| रुद्रप्रयाग टेम्पो ट्रॅव्हलर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान फंडातून मदत जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क: रुद्रप्रयागमधील बद्रीनाथ महामार्गाजवळ चार धाम यात्रेला निघालेल्या २३ यात्रेकरूंनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळला. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले. अपघातातील यात्रेकरुंना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून आर्थिक मदत (Uttarakhand accident) देण्यात आली आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दिली आहे.

टेम्पो ट्रव्हलर उत्तर प्रदेशातील नोएडा येथून रूद्रप्रयागच्या दिशेने जात असताना, ती १५० ते २०० मीटर खोल दरीत कोसळून हा भीषण अपघात झाला. या अपघातातील मृत यात्रेकरूंच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजरा रूपये मदत केंद्र सरकारने जाहीर केली आहे. ही मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (Uttarakhand accident) देण्यात आली आहे.

Uttarakhand accident: पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख

उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये झालेला रस्ता अपघात हृदयद्रावक आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या मनापासून संवेदना. यासोबतच सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी कामना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली, स्थानिक प्रशासन पीडितांना शक्य ती सर्व मदत पुरवण्यात गुंतले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

Back to top button