Uma Ramanan Dies : प्रसिद्ध तमिळ गायिका उमा रामनन यांचे निधन | पुढारी

Uma Ramanan Dies : प्रसिद्ध तमिळ गायिका उमा रामनन यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध प्ले बॅक सिंगर उमा रामनन यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. उमा तमिळ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका होत्या. बुधवार १ मे रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तमिळ चित्रपटांमध्ये अनेक सुंदर गाणी गायली. त्यांच्या परिवारात पती ए व्ही रामनन आणि मुलगा विग्नेश रामनन आहेत. त्यांच्या निधनामागील कारण अद्याप समजलेले नाही.

उमा रामानन एक ट्रेंड सिंगर होत्या. ३५ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी ६ हजारहून अधिक संगीत कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. जेव्हा त्या संगीतकार ए व्ही रामनन यांना भेटल्या तेव्हा त्यांच्या संगीत कार्यक्रमांसाठी कोलॅब करणे सुरु केलं. उमाने आपल्या पतीसाठी अनेक गाणी गायली.

तमिल चित्रपट ‘निजालगल’ मधून त्यांच्या करिअरला मोठी ओळख मिळाली. त्यांनी इलैयाराजा यांच्यासोबत १०० हून अधिक गाण्यांमध्ये काम केलं होतं. इलैयाराजा यांच्या शिवाय त्यांनी संगीतकार विद्यासागर, मणि शर्मा आणि देवा यांच्यासाठीही गाणी गायली.

Back to top button