पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी-प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी-प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव; पुढारी वृत्तसेवा:  जामनेर तालुक्यातील गोद्री येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. यानंतर पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी-प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

जामनेर येथे आत्महत्या केलेल्या तरूणाचे युनुस वजीर तडवी (वय ३४) असे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील गोद्री येथील युनुस वजीर तडवी या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळावरी (दि.१९) रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीला आली. युनुस तडवीचा मृतदेह घरासमोरील ओट्यावर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

याच दरम्यान युनुसची आई रेशमाबाई वजीर तडवी यांनी पहूर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादी दिली यानुसार युनुस वजीर तडवी यांच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याने या संबंधाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असल्याचे नमूद करण्यात आले.

यामुळे आई रेशमाबाई वजीर तडवी यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस स्थानकात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी-प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे हे करीत आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : कोल्हापुरात घडतेय मेरी कोम : रिक्षाचालकाची मुलगी सानिका सासनेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Back to top button