गृहमंत्री पद का नाकारले? जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला खुलासा | पुढारी

गृहमंत्री पद का नाकारले? जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क

काल सांगलीतील विश्रामबाग येथे नतून पोलिस मुख्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मंत्री जयंत पाटील यांनी गृहमंत्रीपद का नाकारले याचा खुलासा केला.

आर आर पाटील यांना मी एकदा गृहखात कसं आहे विचारले तेव्हा आबांनी मला बीपी आणि शुगरची गोळी सुरु आहे का विचारले. मी अजिबात नाही असं म्हटलं. यावर आबांनी मला गृहखात घ्या मग सुरु होईल, असा सल्ला मला आर आर आबांनी त्यावेळी दिल्याचा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दमदाटी करण्यासाठी जाऊ नये, तर पोलिसांना पाठबळ देण्यासाठी जायला पाहिजे. पोलिसांना त्यांचे काम करू द्या. पोलिसांचे मनोध्यर्य वाढवावे लागेल. राजकीय नेत्यांनी त्यांना पाठबळ द्यावे लागेलं. असा सल्लाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राजकीय नेत्यांना दिला.

गृहमंत्री पद न घेण्याबाबत अजित दादांनी जे काही माझ्या बाबतीत सांगितलं ते खरच आहे. गृहमंत्री पद घेतल्यावर ब्लड प्रेशर वाढते आणि मला डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी आता गृहमंत्री पद स्वीकारले नाही, असा खुलासाही जयंत पाटलांनी यावेळी केला.

पोलिस किती तणावात असतील

मी गृहमंत्री असताना मला ब्लड प्रेशर झाला. माझ्या दोन्ही खासगी सचिवांना आजार झाले होते. एवढ तणावाचे काम असते. त्यामुळे तेव्हापासून माझं मत आहे की ब्ल प्रेशर झालाय आता डायबेटिस मागे लागून घ्यायचा नाही. मंत्र्यांना इतका तणाव असेल तर पोलिस किती तणावात असतील याचा विचार आपण केला पाहिजे. त्यांचा तणाव दूर करण्यासाठी उपक्रम राबवले पाहिजेत. त्यांना ३-४ दिवस फिरण्यासाठी सुट्टी द्या, अशा सूचनाही पाटील यांनी दिल्या.

हेही वाचलत का?

Back to top button