Elnaaz Norouzi : सॅक्रेड गेम्‍स फेम एलनाजच्या अदांनी केलं घायाळ | पुढारी

Elnaaz Norouzi : सॅक्रेड गेम्‍स फेम एलनाजच्या अदांनी केलं घायाळ

मुंबई; पुढारी ऑनलाईन: वेब सीरीज सॅक्रेड गेम्‍स फेम आणि बॉलिवूड अभिनेत्री एलनाज नौरोजी ( Elnaaz Norouzi ) नेहमी आपले हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत सक्रीय असते. सध्या एलनाज नौरोजी हिने हटके फोटोशूट केले आहे.

नुकतेच एलनाज नौरोजीने ( Elnaaz Norouzi ) आपल्या इंन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत एलनाजने पांढऱ्या रंगाच्या ड्रेस आणि डेनीममध्ये दिसत असून, त्यासोबत तिने सुंदरशी पर्स आणि टोपी परिधान केली आहे. या लूकमध्ये तिचे सौदर्य खुलून दिसत आहे.

एलनाजने आणखी एका फोटोत शर्टसोबत डेनीममध्ये दिसत आहे. यात तिने चष्मा घालून पोझ दिली आहे. या फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्‍यांनी वेगवेगळ्या कॉमेंन्टस केल्या आहेत. यात एकाने ‘तुझी फॅशन एक प्रकारची जादू आहे. राजकुमारी.’ दुसऱ्या एकाने ‘तू जाळ काढलास’ असा हटके कॉमेंन्टस केल्या आहेत.

आणखी एकाने क्यूट, हॉट असा देखील कॉमेन्टस करत प्रेमाचा आणि पायरचा ईमोजी शेअर केला आहे. एलनाज नौरोजी नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असून आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

कोण आहे एलनाज नौरोजी?

एलनाज नौरोजी ही एक मॉडेल आहे. तिने मॉडेलिंगची सुरूवात वयाच्या १४ व्‍या वर्षाच केली. एलनाजने पंजाबी ‘खिडो खुंडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिला खरी ओळख वेब सीरिज सेक्रेड गेम्स (Sacred Games ) पासून मिळाली. या चित्रपटात तिने ‘जोया मिर्झा’ ची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अभिनयाने तिने चाहत्याच्या मनात घर केलं.

एलनाज नौरोजी एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेली होती. तेव्हा तेथे तिला एका विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागले. यावेळी शूटिंग संपल्यानंतर एलनाज आपल्या खोलीत गेली तेव्हा एका अज्ञान व्यक्तीने तिच्या खोलीत प्रवेश केला.

यानंतर तिने घाबरून आपल्या सहकार्याना ही बाब सांगितले आणि त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर अज्ञान व्यक्तीने माफी मागिल्यावर पोलिसांनी त्याला सोडून दिले होते. या प्रकरणामुळे ती चर्चेत आली होती.

हेही वाचलंत का? 

Back to top button