नगर : एसटी बसमध्ये बसताना सोनसाखळी लांबविली | पुढारी

नगर : एसटी बसमध्ये बसताना सोनसाखळी लांबविली

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : एसटी बसमध्ये बसत असताना साकूर येथील एकाची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने लांबविण्याची घटना संगमनेर बसस्थानकात घडली.

याबाबत संगमनेर शहर पोलिस आपले समजलेले अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर येथील रहिवासी असणारे अनिल विठ्ठल सोनवणे हे संगमनेरला आले होते. पुन्हा साकुरला जाण्यासाठी बस स्थानकात आले आणि साकुरच्या बसमध्ये बसत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची वजनाची सोन्याची साखळी लांबविली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांत अनिल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अनिल धनवट करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून संगमनेर बसस्थानकामध्ये चोर्‍यांचे प्रमाण वाढलेले आहे. महिलांच्या गळ्यातील दागिणे, पर्स आदी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याबाबत पोलिसांनी तत्काळ या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी तत्काळ याचा बंदोबस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Back to top button