Video: आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा | पुढारी

Video: आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा

पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा आषाढी वारीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्‍ते सपत्‍नीक विठ्ठलाची महापूजा करण्यात आली. यावेळी ३५ वर्षे वारी करणाऱ्या बीड जिल्‍ह्यातील नवले दाम्‍पत्‍याला मानाची पूजा करण्याचा मान मिळाला. त्‍यांनी मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठल-रुक्मिणीची पूजा केली.

शेतकरी, कामगार, कष्टकरी, उद्योजक यांच्यासह समाजातील सर्व स्‍तरातील घटकांच्या आयुष्‍यात सुख समृध्दी लाभू दे, राज्याचा सर्वांगीण विकास होऊ दे, कोरोनाचे संकट टळू दे असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेवेळी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांचा सपत्‍नीक सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्‍या. यावेळी भावना व्यक्‍त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पांडुरंगाच्या कृपा आणि आई वडिलांच्या पुण्याईने माझ्यासारख्या कार्यकत्‍याला महापूजा करण्याचा मान मिळाला. उशीरा का होईना राज्‍यात पावसाला सुरूवात झाली आहे. राज्‍यात काही ठिकाणी जास्‍त तर काही ठिकाणी कमी पाऊस पडत आहे. पण यावर्षी पावसामुळे कोठेही नुकसान होउ नये. बळीराजाचे कल्‍याण होउ दे. राज्‍यातील सर्व जनता सुखी समाधानी राहू दे. अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मानाची पूजा करण्याचा मान बीड जिल्‍ह्यातील रूई, ता गेवराई येथील मुरली भगवान नवले, (वय 52 वर्षे) आणि सौ जिजाबाई मुरली नवले, (वय 47) यांना मिळाला. ते गेली २० वर्षे नियमाने वारी करत आहेत. ते यावर्षी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत पायी चालत आले आहेत. ते व्यवसायाने शेतकरी आहेत.

हेही वाचा : 

Back to top button