अक्‍कलकोट : अक्‍कलकोटमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष | पुढारी

अक्‍कलकोट : अक्‍कलकोटमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

अक्‍कलकोट, पुढारी वृत्तसेवा :  विधानपरिषदेच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. या विजयाबद्दल मंगळवारी अक्कलकोट येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव जल्लोष साजरा करण्यात आला.

याप्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, नगरसेवक महेश हिंडोळे, मिलन कल्याणशेट्टी, बाजार समितीचे उपसभापती आप्पासाहेब पाटील, माजी उपनगराध्यक्ष शिवशरण वाले, कांतू धनशेट्टी, बसवंतराव कलशेट्टी, नागराज कुंभार, दयानंद बिडवे, परमेश्‍वर यादवाड, नन्हू कोरबू, लखन झंपले, शिवशंकर स्वामी, संजय राठोड, सिध्दू तडवळ, संजय बडवे, उमेश स्वामी यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

 

Back to top button