सेालापूर : महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविणार | पुढारी

सेालापूर : महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविणार

सेालापूर : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी सकाळी रामलाल चौकातील राष्ट्रवादीच्या कार्यालया समोर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने शहराध्यक्ष भारतजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी महापालिकेवर राष्ट्रवदीचाच झेंडा फडकविण्याचा संकल्प करण्यात आला.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीत पक्षाची ध्येय धोरण शरदचंद्र पवारे आचार, विचार ,प्रचार, लोक विधायक कामे लोकापर्यंत पोहचवून येणार्‍या निवडणूकीत महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याचा संकल्प करण्यात आला. महागाईमुळे संपूर्ण भारत देशातील जनतेला केंद्र सरकारचा आता विरोध निर्माण झाला आहे. आत्ता जनतेनेच भाजप सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य शहराध्यक्ष भारत जाधव यांनी केले मेळाव्याच्या समारोपाच्या वेळेस शहरातील सर्व राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी स्वतःच्या घरावर राष्ट्रवादीचा झेंडाव दरवाजावर स्टीकर लावून वर्धापन दिन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.

या पदाधिकारी मेळाव्यामध्ये, प्रदेश पदाधिकारी, ज्येष्ठ नेते,प्रांतिक सदस्य, महिला आघाडी, फ्रंटल व सेलचे सर्व अध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच संतोष पवार, शफी इनामदार, शंकर पाटील, जनार्दन कारमपुरी, मनोहर सपाटे, महेश गादेकर , नानासाहेब काळे दिलीप कोल्हे सुधीर खरटमल, सिकंदर गोलंदाज, जुबेर बागवान, जावेद खैरेदी, आनंद मुत्सरे, प्रमोद भोसले, चंद्रकांत पवार, बसू कोळी, बाबासाहेब जाधव, जोतिबा गुंड, दादाराव रोटे, सौ. सुनीताताई रोटे, लताताई ढेरे, सौ. नलिनीताई चंदेले, लताताई फुटाणे, खांडेकरताई सपाटेताई, सौ. मंगलाताई कोल्हे, गौराताई कोरे, शशिकला कस्पटेताई, सिया मुलानी, काझीताई, उषाताई बाह्मणेे आदी उपस्थित होते.

Back to top button