समुद्रात उपरचे वारे, उंच लाटा | पुढारी

समुद्रात उपरचे वारे, उंच लाटा

मालवण/देवगड : प्रतिनिधी

उपरच्या वार्‍यामुळे गेले चार दिवस मच्छीमारी व्यवसाय ठप्प आहे. वार्‍याचा जोर कमी होण्याचा मार्गावर असल्याने दोन दिवसानंतर मच्छीमारी व्यवसाय पूर्ववत सुरू होण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे. मालवण किनारपट्टीवर गुरुवारी सकाळपासून जोरदार वार्‍याने थैमान घातले. वार्‍यामुळे समुद्रातही मोठ्या लाटा उसळून लाटांचा वेग वाढल्याने बहुतांश मासेमारी नौकांनी सुरक्षेच्या द‍ृष्टीने किनारा गाठला. यामुळे मासेमारीवरही परिणाम झाला. तर जोरदार वार्‍यामुळे देवबाग-भाटकरवाडी येथील कृष्णाजी मनोहर भाटकर यांच्या घरावर माड कोसळून नुकसान झाले.

गेले चार दिवस उपरचा वारा सुरू झाल्यामुळे मच्छीमारी व्यवसायावर परिणाम झाला होता. तरीही वार्‍याचा जोर कमी झाल्यानंतर काही नौका समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी जात होत्या. मात्र, गुरुवारी समुद्रात उपरचा वारा सुरू झाल्यामुळे मच्छीमारी नौका देवगड बंदरात परतल्या.

Back to top button