राष्ट्रवादीच्या कार्यालयात शरद पवारांचे जंगी स्वागत; रोहित पवारांनी केली पहिल्यांदाच एन्ट्री! | पुढारी

राष्ट्रवादीच्या कार्यालयात शरद पवारांचे जंगी स्वागत; रोहित पवारांनी केली पहिल्यांदाच एन्ट्री!

मुंबई : पुढारी ऑनलाईन

आपल्या एकहाती झंझावाती प्रचाराने बलाढ्य भारतीय जनता पक्षाचा वारू रोखलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे आज (ता.३०) पक्षाच्या कार्यालयात जोरात स्वागत करण्यात आले. 

विधानसभेतील गटनेता निवडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आज मुंबईतील पक्षाच्या कार्यालयात होत आहे. यासाठी  पक्षाचे सर्व नुतन आमदार दाखल झाले आहेत. या निवडणुकीत युवा चेहरा म्हणून समोर आलेल्या पवार कुटुंबीयातील आमदार रोहित पवार यांचेही आगमन झाले आहे. आजच्या बैठकीत गटनेता निवडला जाणार आहे. 

पवारांचे पक्षाच्या कार्यालयात आगमन होताच तुतारी वाजवून स्वागत करण्यात आले. कार्यालयही आकर्षक करण्यात आले आहे. पहिल्यांदाच पक्षाच्या कार्यालयात प्रवेश करत असलेल्या आमदार रोहित पवार यांनी आपल्यासाठी सर्वांत मोठा दिवस असल्याचे  सांगितले. पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची संख्या अनेक असल्याने उत्सुकता असल्याचेही ते म्हणाले. 

राज्यात दिवाळीची धुम पार पाडल्यानंतर सरकार स्थापनेसाठी वेग आला आहे. आज (ता.३०) भारतीय जनता पक्षाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. औपचारिकपणे विधिमंडळ नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नेता निवडीचा प्रस्ताव आणला. त्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह १० आमदारांनी अनुमोदन दिले. 

 

Back to top button