कोल्हापूर : सहायक पोलिस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी निलंबित | पुढारी

कोल्हापूर : सहायक पोलिस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी निलंबित

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा वडगाव पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी यांच्यावर कर्तव्यात कसुरी केल्याचा ठपका ठेवून शुक्रवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ही कारवाई केली. सूर्यवंशी यांच्या विभागीय चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत.

पोलिस अधीक्षकांनी त्यास दुजोरा दिला. सहायक निरीक्षक सूर्यवंशी यांच्या कार्यपद्धतीवर तक्रारी होत्या. प्राथमिक चौकशी अहवालात कर्तव्यात कसुरीचा केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. चौकशी अहवालाच्या अनुषंगाने सूर्यवंशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वडगावचे पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांची प्रशासकीय कारणास्तव चंदगडला बदली झाल्याचेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

हेही वाचलतं का?

Back to top button