कोल्हापूर : देश उभारणीत बांधकाम क्षेत्राचे योगदान मोलाचे : शाहू महाराज | पुढारी

कोल्हापूर : देश उभारणीत बांधकाम क्षेत्राचे योगदान मोलाचे : शाहू महाराज

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा देशाच्या उभारणीत बांधकाम व्यावसायिकांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन शाहू महाराज यांनी केले. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित नूतन पदाधिकारी पदग्रहण समारंभ व बांधकाम व्यावसायिकांच्या जीवन गौरव पुरस्कार समारंभात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून खा. संजय मंडलिक उपस्थित होते.

विशेष जीवन गौरव पुरस्काराने व्ही. बी. पाटील, अजयसिंह देसाई यांना गौरविण्यात आले. तसेच कै. सुहास गणपतराव लिंग्रस, कै. कृष्डात ज्ञानदेव कोंडेकर, बाबुराव भाऊसो निगडे यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार दिला. शाहू महाराज म्हणाले, सामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी असोसिएशनने प्रयत्न करावेत. बांधकाम करताना प्रामाणिक राहा. या व्यवसायाला उद्योगांचा दर्जा देण्याची गरज आहेे. खा. मंडलिक म्हणाले, बांधकाम साहित्याच्या किमती वाढत आहेत.

यावर नियंत्रण आणण्यासाठी शासन व असोसिएशने एकत्र प्रयत्न करावेत. बिल्डर्स असोसिएशनचे राज्य अध्यक्ष दत्तात्रय मुळे म्हणाले, बांधकाम साहित्याच्या दरवाढीमुळे व्यावसायिकांना पदरमोड करावी लागत आहे. शासनाने या दरवाढीवर नियंत्रण आणावे. माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील यांनी बांधकाम क्षेत्रातील समस्या मांडल्या.

व्ही. बी. पाटील यांनी सत्काराला उत्तर दिले. यावेळी नूतन कार्यकारिणी जाहीर झाली. अध्यक्षपदी ऋषिकेश यादव, उपाध्यक्ष मदन भंडारी, सचिव उमेश शेठ, रणजित पाटील, प्रशांत मुचंडी, प्रताप कोंडेकर यांची निवड झाली. स्वागत माजी अध्यक्ष सचिन पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रताप कोंडेकर यांनी केले. आभार ऋषिकेश यादव यांनी मानले. यावेळी साबांवि अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, ऋतुराज पाटील उपस्थित होते.

हेही वाचलतं का?

Back to top button