लोणावळा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; 4 करोड रुपयांची अवैध रोकड जप्त. | पुढारी

लोणावळा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; 4 करोड रुपयांची अवैध रोकड जप्त.

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने एका स्विफ्ट गाडीतून अवैध रित्या घेऊन जाण्यात येत असलेली 4 करोड रुपयांची रोकड लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून जप्त करण्यात आली असून दोघांना ताब्यात घेण्यात आले असल्येची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक 28 मार्च रोजी पोलिसांना गोपनीय माहिती प्राप्त झाली कि मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर अवैध्य रित्या शत्र व पैशाची वाहतुन होणार आहे. त्यावर सदर बातमीची शहानिशा व खातर जमा करणेसाठी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे एक पथक नेमण्यात आले.

SRH vs RR : हैदराबादने टॉस जिंकला, राजस्थानची फलंदाजी

सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान संशयीत कार मुंबईकडुन पुण्याकडे जाताना मिळुन आली. पोलिसांनी त्यास थांबवण्याच इशारा केला. मात्र न थांबता सदर गाडी पुढे निघुन जावु लागली असता पोलिसांनी कैशल्याने गाडी ताब्यात घेतली. सदर मारुती स्विफ्ट कार (क्र. KA-53-MB-8508) चेक करण्यात आली तेव्हा सदर कार मध्ये एक चोर कप्यात 4 करोड रुपयाची रोख रक्कम मिळून आली.

याप्रकरणी गाडीचा चालक महेश नाना माने (रा. विठा, जि. सांगली) व विकास संभाजी घाड़गे (रा. शेटफळ, जि. सांगली) सदर रक्कमेबाबत विचारपुस करता त्या संबंधी कागदपत्रे अथवा पुरावे व वाहतुक परवाना व त्याबाबतचे कारण सांगता आले नाही.

‘आगामी निवडणुकीत राहुल गांधीच देशाचे पंतप्रधान होतील, काँग्रेस आशेचा किरण’

पोलिसांकडून सदरच्या रक्कमेबाबत माहिती घेण्याचे काम चालु असुन ऐवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम कोठुन व कशासाठी आणली तसेच लपुन छपुन कोणतेही कागदपत्र नसताना वाहतुन करताना मिळुन आले या बाबतची माहीती व शोध घेण्यात येत असुन सदर प्रकरणी आयकर विभाग पुणे यांना कळविण्यात आले आहे.

पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा राजेंद्र पाटिल, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रविण मोरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर,

राजामौलींनी आलियाला दिला धोका? अभिनेत्रीने RRR शी संबंधित पोस्ट हटवल्या

पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, सहा फौजदार शिताराम बोकड, युवराज बनसोडे, पोलीस हवालदार अमित ठोसर, महिला पोलिस नाईक पुष्पा घुगे, पोलीस नाईक गणेश होळकर, किशोर पवार, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर शिंदे यांनी या कामगिरीमध्ये सहभाग घेतला होता. याप्रकरणी पुढील कारवाई आयकर विभाग हे करीत आहे.

 

 

Back to top button