नाना पटोले : ‘आगामी निवडणुकीत राहुल गांधीच देशाचे पंतप्रधान होतील, काँग्रेस आशेचा किरण’ | पुढारी

नाना पटोले : 'आगामी निवडणुकीत राहुल गांधीच देशाचे पंतप्रधान होतील, काँग्रेस आशेचा किरण'

भंडारा, पुढारी वृत्‍तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे व्हिजन आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राहुल गांधी हेच भारताचे पंतप्रधान होतील, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. भंडारा येथील एका कार्यक्रमात माध्यमांशी ते बोलत होते. केंद्रात सत्तेवर येण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी खोटे आश्वासन दिले होते. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना काँग्रेस पक्ष हेच आशेचा किरण दिसत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच, सरकार गेल्यानंतर भाजपाची तडफड सुरू झाली आहे. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकार पाडण्यासंदर्भात नवनवी वक्तव्य राजकिय नेते करीत असतात. या सरकारमध्ये तिन्ही पक्षांची बरोबरीची भागीदारी आहे. दररोज नवनव्या अफवा उडवून सरकारमध्ये मतभेद निर्माण करण्याचे काम विरोधकांकडून केले जात आहे. राजकीय द्वेषापोटी भाजपने ईडीची कारवाईचे कृत्य सुरू केलेले आहेत. भाजपची नजर काळी आहे. मात्र त्यांच्या काळ्या जादूचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल. राहुल गांधी यांच्याकडे देशासाठी व्हिजन असल्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर येईल आणि राहुल गांधी हे पंतप्रधान होतील, असा आशावाद प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा  

Back to top button