

टोकियो: जपानमधील ओकिनावा बेटावरील बहुतेक नागरिक शतायुषी (The secret of long life) आहेत. त्यांच्या दीर्घायुष्यामागे नक्की काय रहस्य आहे, हे शोधण्यासाठी अनेक संशोधकांनी त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला. अखेरीस त्यांना रहस्याचा उलगडा झाला आहे.
गेली अनेक शतके (The secret of long life) ओकिनावाचे रहिवासी हारा हाची बुया तत्त्वाचे पालन करतात. या शब्दाचा अर्थ भुकेवेळी पोट भरून न जेवता पोट २० टक्के रिकामे राहील, याची काळजी घ्यायला हवी. हे तत्त्व येथील लोक काटेकोर पाळतात. त्यामुळे ते शतायुषी ठरले आहेत. जपानी संस्कृतीत हारा हाची बु हे तत्त्व प्राचीन काळापासून चालत आले आहे. पोट भरून जेवले तर पचनही सावकाश होते. त्यामुळे शरीरामधील पेशींचे ज्वलन होण्यास सुरुवात होते. पेशींच्या ज्वलन प्रक्रियेमुळे शरीर लवकर थकते. माणूस लवकर म्हातारा होतो. ओकिनावामधील रहिवाशांचा आहार पाहता ते लोक दिवसाला १८०० ते १९०० कॅलरीज मिळतील, एवढाच आहार घेतात.
हेही वाचा :