BBC Documentary : PM मोदींवरील बीबीसीच्या ‘डॉक्युमेंट्री’ची यू ट्यूब लिंक, ट्विट्स ब्लॉक – केंद्राचे आदेश | पुढारी

BBC Documentary : PM मोदींवरील बीबीसीच्या 'डॉक्युमेंट्री'ची यू ट्यूब लिंक, ट्विट्स ब्लॉक - केंद्राचे आदेश

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा, केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी बीबीसीची डॉक्युमेंट्री शेअर करणारे ट्विट्स ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या यूट्यूब लिंक ज्या ट्विटच्या माध्यमातून शेअर करण्यात आले होते, त्यांना देखील ब्लॉक करण्यात आले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आली. BBC Documentary

बीबीसी डॉक्युमेंट्रीचा पहिला भाग यूट्यूबवर शेअर करण्यात आलेले सर्वच व्हिडीओ ब्लॉक करण्यात यावेत, असे आदेश मंत्रालयाने दिले आहेत. शिवाय ट्विटरला बीबीसी डॉक्युमेंट्री ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’च्या यू ट्यूब व्हिडीओ लिंक असलेल्या ५० हून अधिस ट्विटला ब्लॉक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयटी नियम २०२१ नुसार आपत्कालीन अधिकारांचा वापर करीत हे निर्देश देण्यात आले आहेत.

BBC Documentary : विशेष म्हणजे यू ट्यूब आणि ट्विटरने मंत्रालयाने दिलेल्या आदेशांचे पालन केले आहे. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशने (बीबीसी) ही डॉक्युमेंट्री बनवली आहे. परंतु निष्पक्षतेचा अभाव असलेला तसेच वसाहतवादाच्या मानसिकतेला दर्शवणारे हे एक प्रचारतंत्र असल्याचे मत परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केले आहे. बीबीसीने ही डॉक्युमेंट्री काही यू ट्यूब चॅनलवर अपलोड केली आहे. भारतविरोधी अजेंडाला प्रोत्साहन देण्यासाठी हे अपलोड करण्यात आल्याचे मत मंत्रालयाने व्यक्त केले होते.

यू ट्यूबने हा व्हिडीओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवर अपलोड झाल्यास ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. ट्विटरने देखील इतर प्लॅटफॉर्मवर या व्हिडीओची लिंक असलेल्या ट्विटला ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. ही डॉक्युमेंट्री सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार तसेच विश्वसनीयतेवर आक्षेप घेणारी, देशातील विविध समाजांमध्ये विभाजनाचे बीज पेरणारी तसेच निराधार आरोप लावणारी असल्याचे परराष्ट्र मंत्रालय, गृह तसेच माहिती प्रसारण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात आढळले आहे. BBC Documentary

हे ही वाचा :

पीएफआयचा 2047 पर्यंत भारताच्या इस्लामीकरणाचा कट

Health : ‘स्लिप डिस्क’, दूर्लक्ष करू नका; जाणून घ्या कारण-लक्षणे आणि उपाय

Back to top button