फेसबुक आणि इंस्टाग्रामची पेड ब्लू टिक सेवा सुरू, किती रुपये मोजावे लागणार… जाणून घ्या सविस्तर | पुढारी

फेसबुक आणि इंस्टाग्रामची पेड ब्लू टिक सेवा सुरू, किती रुपये मोजावे लागणार... जाणून घ्या सविस्तर

पुढारी ऑनलाईन: ट्विटरच्या सशुल्क ब्लू टिक सेवेनंतर मेटाने देखील सशुल्क ब्लू टिक सेवेची घोषणा केली. कंपनीने गेल्या आठवड्यात याची घोषणा केली आणि आता ती सुरू झाली आहे. आता फेसबुक आणि इंस्टाग्रामचे वापरकर्ते पैसे देऊन त्यांचे खाते व्हेरिफाइड करू शकतात. आतापर्यंत ही सेवा विनामूल्य होती.

फेसबुक आणि इंस्टाग्रामने प्रथम ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सशुल्क सदस्यता सुरू केली. या देशांतील वापरकर्त्यांना वेब आवृत्तीसाठी $11.99 (सुमारे 990 रुपये) आणि iOS आणि Android मोबाइल प्लॅटफॉर्मसाठी प्रति महिना $14.99 (सुमारे 1,240 रुपये) द्यावे लागतील.

फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी वापरकर्त्यांना सरकारी ओळखपत्र द्यावे लागेल. याशिवाय पैसे देणाऱ्या वापरकर्त्यांना थेट ग्राहक सपोर्ट मिळेल आणि त्यांच्या पोस्ट्सपर्यंत पोहोचू शकेल. मेटा प्रवक्त्याने सांगितले आहे की, फेसबुक आणि इंस्टाग्रामचे सशुल्क व्हेरीफिकेशन फिचर येत्या सात दिवसांत जागतिक स्तरावर सुरू केले जाईल. मात्र, सिडनीमधील काही वापरकर्त्यांनी त्यांना सेवा न मिळाल्याची पुष्टी केली आहे. या सेवेमुळे मेटाच्या महसुलात मोठी वाढ होऊ शकते.

मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने नुकतीच पेड सबस्क्रिप्शन सेवा ट्विटर ब्लू लाँच केली आहे. भारतातील मोबाइल वापरकर्त्यांना ब्लू टिक मिळवण्यासाठी आणि प्रीमियम सबस्क्रिप्शन सेवेची फिचर वापरण्यासाठी दरमहा 900 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, कंपनीने सर्वात कमी किमतीचा प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅन 650 रुपयांचा जारी केला आहे. ही योजना वेब वापरकर्त्यांसाठी आहे.

Back to top button