WhatsApp यूजर्स प्रोफाइल फोटोला लावू शकतात त्यांचा 3D-अवतार, येतंय नवं फिचर! | पुढारी

WhatsApp यूजर्स प्रोफाइल फोटोला लावू शकतात त्यांचा 3D-अवतार, येतंय नवं फिचर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हॉट्सअॅप (WhatsApp) एका नव्या फिचरवर काम करत आहे. हे फिचर यूजर्संना त्यांचा अवतार स्वरुपातील फोटो प्रोफाइल पिक्चर (profile picture) म्हणून लावण्याची सुविधा देणार आहे. व्हॉट्सअॅप ट्रॅकर WABetaInfo च्या अहवालानुसार, Android साठी WhatsApp beta वर विकसित केलेले हे फिचर iOS आणि डेस्कटॉपवर देखील उपलब्ध असेल. याआधी अशीही माहिती समोर आली होती की व्हॉट्सअॅप त्यांच्या यूजर्ससाठी ॲनिमेशन अवतारच्या मदतीने व्हिडिओ कॉलला उत्तर देण्याच्या सुविधेवर काम करत आहे.

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp एक अवतार प्रोफाइल फोटो फिचरवर काम करत आहे. हे फिचर आपल्या कस्टमाइज अवतारला प्रोफाइल फोटो म्हणून लावण्याची सुविधा देणार आहे. WhatsApp Avtar हे एक असे फिचर आहे ज्यामार्फत यूजर्स त्यांचा एक थ्रीडी- कार्टून सारखा अवतार बनवू शकतात. WhatsApp वर कोणाशीही बोलताना यूजर्स आता चॅट इमोजी, GIF आणि स्टिकर्स एकमेकांना पाठवू शकतात.

WhatsApp यूजर्स आपल्या अवताराला चॅटमध्ये कोणालाही पाठवण्याव्यतिरिक्त आपल्या प्रोफाइल फोटो स्वरुपात सेट करु शकतात. यूजर्स प्रोफाइल फोटोचा वापर करण्यासाठी बॅकग्राउंड रंग निवडून अवतारला कस्टमाइज करु शकतात. मेटा (Meta) त्यांच्या अवतार फिचरला याआधीच फेसबुक, इंस्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजरवर लाँच केले आहे. आता हे फिचर व्हॉट्सअॅपवर लाँच करण्याची तयारी केली जात आहे. WABetaInfo च्या म्हणण्यानुसार हे फिचर विकसित टप्प्यात असून पुढील अपडेटमध्ये हे सादर केले जाण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सॲप हे अत्यंत लोकप्रिय ॲप आहे. व्हॉट्सॲपने यूजर्संच्या अडचणी आणि गरज विचारत घेता, वेळोवेळी सातत्याने आपल्या ॲपमध्ये बदल केले आहेत. व्हॉट्सॲपने मेसेजसंदर्भात नुकतीच एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये पाठवलेल्या मेसेज युजर्सना दोन दिवसांनी देखील डिलिट करता येणार आहे.

Back to top button