अनन्या अनभुलेची नागफणी कड्यावर यशस्वी चढाई

नागफणी या कड्यावर यशस्वी चढाई करणारे अनन्या अनभुले आणि योगेश विरकर.
नागफणी या कड्यावर यशस्वी चढाई करणारे अनन्या अनभुले आणि योगेश विरकर.
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

तेरा वर्षीय राष्ट्रीय गिर्यारोहक अनन्या अनभुले हिने गिर्यारोहक योगेश विरकर यांच्या समवेत नागफणी या कड्यावर यशस्वी चढाई केली आहे. समुद्रसपाटीपासून दोन हजार फुट उंचीवर असलेल्या आव्हानात्मक आणि खडतर मार्ग यशस्वीपणे पुर्ण केला आहे.

अनन्याला वयाच्या सहाव्या वर्षापासूनच गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली होती. 2016 मध्ये पुणे महापालिकेच्या शिवाजीनगर येथील राजे शिवाजी क्‍लाइबिंग वॉलमध्ये येथे सरावासाठी ती सहभागी झाली. अनन्याला प्रशिक्षक अमोल जोगदंड, इरफान शेख आणि मंटु मंत्री यांचे मार्गदर्शन मिळाले. महानगरपालिकेने आयोजित केलेल्या महापौर चषक स्पर्धेत स्पायडर किड्स प्रकारात ती सुवर्णपदक विजेती होती. वयाच्या आठव्या वर्षी स्पोर्ट्स क्लाइंबिंग कारकीर्दीतील ही तिची पहिली स्पर्धा होती. 2019 मध्ये ती सिक्कीम येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत लीड क्लाइंबिंगमध्ये सुवर्णपदक विजेती होती. तिने चीन आणि थायलंड येथे झालेल्या आशियाई किड्स चॅम्पियनशिपमध्ये दोनदा भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

योगेश वीरकर यांचाही पराक्रम

योगेश विरकर यांना 2017 मध्ये गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. अतिशय कमी कालावधीत त्यांनी बान रे बोल्टिंग प्रकल्पासह नानाचा आंगठा, खडा परशी, तैेलबैला आणि ड्युकेसनोज यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. 2022 मध्ये माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे ध्येय आहे. या दोन्ही गिर्यारोहकांचे यश हे अथक परिश्रम आणि त्यांच्या प्रशिक्षकांनी राजे शिवाजी क्लाइंबिंग वॉलमध्ये घेतलेले कठोर व नियोजित प्रशिक्षण आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news