पुण्यात ते दोघे विमानातून यायचे अन् घरफोड्या करायचे! दोन सराईतांना अटक | पुढारी

पुण्यात ते दोघे विमानातून यायचे अन् घरफोड्या करायचे! दोन सराईतांना अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा

विमानाने येऊन पुण्यात घरफोड्या करणार्‍या उत्तर प्रदेशातील दोन सराईतांना गुन्हे शाखेच्या युनिट चारने अटक केली आहे. त्यांच्याकडून विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणताना 6 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पुणे : बोगस भरती प्रकरणातील मोठे मासे अद्याप मोकाटच!

परवेज शेर मोहम्मद खान आणि तस्लिम अरिफ समशुल खान (वय 23, रा. दोघेही उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विश्रांतवाडी परिसरात झालेल्या घरफोडीचा गुन्ह्याचा तपास युनिट चारकडून सुरू होता. त्यामध्ये पोलिसांनी दीडशे ते दोनशे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी तो घरफोडीचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी परवेज याने केल्याचे आढळून आले. त्यानुसार त्याला पकडण्यासाठी पथक दिल्लीला गेले. पण, तो आढळून आला नाही.

पुढारी वॉच : एसटीचे पुणे विभागीय कार्यालय की दारूचा अड्डा; परिसरातच हाय-फाय दारूच्या बाटल्या

परवेज पुण्याला घरफोडी करण्यासाठी विमानाने निघाला. त्याची माहिती युनिट चारला मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक जयदीप पाटील यांच्या पथकाने सापळा रचून त्याला व साथीदाराला पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले.

पुणे मेट्रो : संभाजी पुलावरील काम अखेर तडीस; पोलिस बंदोबस्तात काम फत्ते

परवेज पुण्यात राहिलेला आहे. त्यामुळे त्याला परिसराची माहिती होती. या भागातच तो घरफोडीचे गुन्हे करायचा. त्यासाठी दिल्लीहून तो विमानाने सकाळी पुण्यात यायचा. त्याचा साथीदार पूर्वीच ट्रॅव्हल्सने पुण्यात आलेला असायचा. दोघे एकत्र आल्यानंतर बंद फ्लॅट हेरून घरफोडीचे गुन्हे करायचे. दुपारी चारपर्यंत गुन्हे केल्यानंतर मुद्देमाल साथीदारामार्फत पुन्हा ट्रॅव्हल्सने पाठवायचा. तो विमानाने परत जायचा. परवेज सराईत असून त्याच्यावर पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात नऊ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला यापैकी काही गुन्ह्यांत शिक्षादेखील झाली आहे. आरोपी विमानाने अथवा कधी-कधी ट्रॅव्हल्सने येऊन घरफोड्या करीत होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत राजूरकर, उपनिरीक्षक जयदीप पाटील, राजस शेख, राकेश खुणवे, अशोक शेलार, रमेश राठोड यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक २८ डिसेंबरला, थोपटे, चव्हाण, राऊत यांची नावे चर्चेत

Diavol Ransomware : ईमेल मधून नवीन रॅन्समवेअरचा शिरकाव, केंद्र सरकारकडून अलर्ट जारी

दिलासादायक यश : आरएसव्ही लस निर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

Back to top button