पुणे : एसटी कार्यालयात दारूच्या बाटल्या प्रकरणी चन्ने यांचे चौकशीचे आदेश

ST Daru
ST Daru

पुणे : पुढारी वृत्तसेवा

एसटीच्या विभागीय कार्यालयाअंतर्गत अशा प्रकारच्या दारूच्या बाटल्या सापडणे हे निंदनीय आहे, यामुळे खात्याची प्रतिमा मलीन होत असून, संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांची कडक चौकशी करणार असल्याचे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दै. 'पुढारी' शी बोलताना सांगितले. चौकशी दरम्यान दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले.

सुरक्षा रक्षक असतानासुद्धा एसटीच्या मुख्य विभागीय कार्यालयाच्या इमारतीला लागूनच बाटल्यांचा खच पडला आहे. या सर्व बाटल्या हायफाय ब्रँडच्या असून, या बाटल्या आतमध्ये कोणी आणल्या? कार्यालयाला रात्रीच्या पार्टी साठी कोण कोण उपस्थित होते? पार्टी किती अधिकाऱ्यांनी केली? असे प्रश्न निर्माण होत आहेत. त्या संदर्भातील वृत्त शुक्रवारी दिनांक 24 रोजी दैनिक 'पुढारी'मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. याची दखल थेट मुंबई येथील एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी घेतली आहे.

एसटीच्या विभागीय कार्यालयात एक दोन नव्हे तर सुमारे वीस ते तीस दारूच्या हायफाय ब्रँडच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. आणि या बाटल्या गेल्या अनेक दिवसांपासून येथे पडून आहेत, तर काही बाटल्या या नव्या नुकत्याच संपलेल्या दिसत आहेत. यावरून गेल्या अनेक दिवसांपासून या विभागीय कार्यालयात दारूच्या पार्ट्या जोरात होत असल्याचे दिसत आहे.

दुखावलेल्या चालकांनी मुद्दाम केली पार्टी : पुणे विभाग नियंत्रक

यासंदर्भात शेखर चन्ने म्हणाले, या परिसरात,भाड्यानं घेतलेल्या बसेसचे ड्रायव्हर मुक्कामासाठी थांबतात. हे चालक या जागी नॉनव्हेज पार्टी करतात, असं 15 दिवसांपूर्वी पुणे विभागीय नियंत्रकांच्या पाहणीत आढळलं. तातडीनं ठेकेदाराला कळवण्यात आलं, या चालकांच्या बसेस काढून टाकण्याची कारवाई तत्काळ केली. यामुळे दुखावलेल्या काही चालकांनी अशा प्रकारची पार्टी ही मुद्दाम केली असावी, असा अहवाल पुणे विभाग नियंत्रकांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news