पुढारी ऑनलाईन : (आयकर) गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इंटेलिजेंस डायरेक्टरेट जनरल (DGGI) च्या अहमदाबाद टीमने उत्तर प्रदेशातील कानपूरमधील एक मोठ्या व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकला. गेल्या अनेक दिवसांपासून छापेमारी सुरू आहे. या छाप्यादरम्यान व्यावसायिकाशी संबंधित पुरवठादारांच्या घरातून सुमारे 150 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
या छापेमारीतील फोटोमध्ये दोन कपाटांमध्ये नोटांचे बंडल भरलेली दिसत आहे. नोटांची बंडलं प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळून ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक फोटोमध्ये 30 पेक्षा जास्त बंडल दिसत आहेत.
दुसर्या फोटोत आयकर विभाग आणि जीएसटी अधिकारी एका खोलीत बसलेले दिसतात. या चौघांसमोर रोख रकमेचा ढीग असून त्यांची मोजणी करण्यासाठी तीन मशीन बसवण्यात आल्या आहेत.
हा पुरवठादार गुटखा व्यापाऱ्याला अत्तर आणि कच्चा माल पुरवतो. नोटा मोजण्यासाठी स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. अजूनही नोटांची मोजणी सुरू आहे. जीएसटी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ई-वे बिल तयार न करता बनावट पावत्यांद्वारे माल पाठवला जात होता. या बनावट पावत्या बनावट कंपन्यांच्या नावाने तयार करण्यात आल्या होत्या.
जीएसटी अधिकाऱ्यांनी सांगितले की, अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या नावाने पावत्या तयार करण्यात आल्या आहेत. ई-वे बिल टाळण्यासाठी बनावट कंपन्यांच्या नावाने तयार केलेली सर्व चलन ५०,००० रुपयांपेक्षा कमी आहेत. त्या व्यापाऱ्याच्या गोदामातून जीएसटी न भरता अशा 200 बनावट पावत्या मिळाल्या आहेत.
हेही वाचलत का?