सिलेक्टरसमोर झुकलो नाही म्हणून माझी निवड झाली नाही; गंभीरचा मोठा गौप्यस्फोट | पुढारी

सिलेक्टरसमोर झुकलो नाही म्हणून माझी निवड झाली नाही; गंभीरचा मोठा गौप्यस्फोट

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने आपल्या करिअरशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे. रवीचंद्रन अश्विनसोबतच्या चॅट शोमध्ये बोलताना गंभीरने त्याचा १४ वर्षांखालील स्पर्धेसाठी खेळताना आलेला अनूभव सांगितला.

अश्विनच्या यूट्यूब चॅनलवर गंभीरने केला खुलासा

रविचंद्रन अश्विनच्या यूट्यूब चॅनलवर दिलेल्या एका व्हिडिओ मुलाखतीत गंभीरने सांगितले की, प्रथमच १४ वर्षांखालील स्पर्धेसाठी खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी, निवडकर्त्याच्या पायांना स्पर्श न केल्यामुळे माझी अंडर-१४ संघात निवड झाली नाही. पुढे तो म्हणाला, ‘माझी पहिली अंडर-१४ स्पर्धा मी १२-१३ वर्षांचा असताना झाली.’ गौतम गंभीरने १४ वर्षांखालील स्पर्धेमध्ये आपल्याशी भेदभाव कसा केला गेला हे यावेळी उघड केले.

मी कधीच कोणाच्या पाया पडणार नाही

गंभीर म्हणाला की, मी निवडकर्त्याच्या पायाला हात लावला नाही, त्यामुळे माझी निवड झाली नाही आणि यापुढे कधीही कोणाच्या पायाला हात लावणार नाही, अशी शपथ घेतली आहे. गंभीरने जाहीर केले की, ‘आता आपण कधीच कोणाच्या पाया पडायचे नाही आणि कधीच कोणाला माझ्या पाया पडू देणार नाही.

केकेआरच्या ताफ्यात एन्ट्री झाल्यापासून संघात अनेक बदल

आयपीएल २०२४ मध्ये गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सच्या मार्गदर्शकाची भूमिका सांभाळल्यापासून केकेआरचे नशिब उजळले आहे. गंभीरची केकेआरच्या ताफ्यात एन्ट्री झाल्यापासून संघात अनेक बदल पाहायला मिळाले. भारतीय संघासोबतच गौतम गंभीरनेही केकेआरसाठी चमकदार कामगिरी केली. तो २००७ आणि २०११ मध्ये भारताच्या विश्वविजेत्या संघाचा हिस्सा राहिला आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने २०१२ साली व २०१४ साली दुसऱ्यांदा चॅम्पियन बनले. यंदाच्या हंगामात आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. सध्या केकेआर संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी असून संघ ट्रॉफी जिंकण्याची शर्यतीत आहे. केकेआरचे सर्व खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.

अश्विनच्या यूट्यूब चॅनलवर शाहरुख खान केले कौतुक

याच शोमध्ये गंभीरने केकेआरचा सहमालक शाहरुख खानबाबतही मोकळेपणाने बोलला. अश्विनच्या यूट्यूब चॅनलवर गंभीर म्हणाला, ‘मी यापूर्वीही अनेकदा सांगितले आहे, शाहरुख खान आतापर्यंत काम केलेला संघातील सर्वोत्तम संघमालक आहे.

Back to top button