वाशिम: समृद्धी महामार्गावर ट्रकला कारची धडक; ३ जण जागीच ठार

वाशिम: समृद्धी महामार्गावर ट्रकला  कारची धडक; ३ जण जागीच ठार
वाशिम: समृद्धी महामार्गावर ट्रकला कारची धडक; ३ जण जागीच ठार

वाशिम: पुढारी वृत्तसेवा: चालकाला डुलकी लागल्याने नियंत्रण सुटून कार उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन जोरात धडकली. यात कारमधील ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात समृद्धी महामार्गावरील रिधोरा इंटर चेंजजवळ (ता. मालेगाव, जि. वाशिम) येथे आज (दि.३) सकाळी ९. ४५ च्या सुमारास घडला. या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र कायम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.  Samruddhi Highway Accident

सादल काजी, आलम हुसेन (कर अधिकारी), आरिफ खान अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, समृद्धी महामार्गावरील रिधोरा इंटर चेंजजवळ  रस्त्याच्या कडेला ट्रक (एमएच १५ जे सी ९६९५)  थांबला होता. यावेळी संभाजीनगरवरून अमरावतीकडे भरधाव निघालेल्या कारने ट्रकला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा अर्धा भाग ट्रकच्या मागील बाजूला घुसला होता. चालकाला डुलकी लागून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. Samruddhi Highway Accident

कारमधील सादल काजी, आलम हुसेन (कर अधिकारी) हे दोघे जागीच ठार झाले. तर आरिफ खान हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना  रुग्णवाहिकेतून मालेगाव ग्रामीण रुग्णालयात दखल केले. परंतु उपाचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एपीआय दांदडे, पीएसआय मोरे व मालेगाव पोलीस स्टेशचे अधिकारी,  कर्मचारी, रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले.

समृद्धी महामार्ग बनतोय धोकादायक

समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असला तरी हा महामार्ग खुला झाल्यानंतर दररोज अपघाताची सतत मालिका सुरूच आहे. यामध्ये अनेकांचा अपघात होऊन मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे प्रवाशी वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news