IND vs NZ 2nd Test : दुसऱ्या कसोटीत कोणाला चान्स मिळणार ? - पुढारी

IND vs NZ 2nd Test : दुसऱ्या कसोटीत कोणाला चान्स मिळणार ?

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला बीसीसीआयने विश्रांती दिली होती. विराट न्यूझीलंड विरूध्दच्या मालिकेमध्ये फक्त एक सामना खेळणार आहे. न्युझीलंड विरूध्दच्या तीन टी-२० व एका कसोटी सामन्यात विश्रांती घेऊन मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात खेळणार आहे. विराटच्या परतीने सध्याच्या संघातील एका खेळाडूला आपली जागा द्यावी लागणार आहे. यामुळे भारतीय संघात मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात काही बदल होण्याची शक्यता आहे.

टीम इंडिया न्युझीलंड विरूध्द मालिकेतील शेवटचा कसोटी सामना वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात कोहलीचे पुनरागमन होणार आहे. याव्यतिरीक्त टीम इंडियाकडून या सामन्यात काही बदल करून टीम इंडिया न्यूझीलंड विरूध्द खेळण्यासाठी सज्ज होईल.

हा सामना दोन्ही संघांसाठी मह्त्वाचा ठरणार आहे. कारण कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिल्याने या मालिकेतील दुसरा व शेवटचा सामना जिंकून कसोटी मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करतील यात शंका नाही. गेल्या सामन्यात भारताकडून काही चुका झाल्या त्याचा फटका म्हणून सामना अनिर्णित राहिला. गेल्या सामन्यातील चुकांची पुनरावृत्ती होऊ नये साठी टीम इंडिया प्रयत्न करेल.

अजिंक्य रहाणेला डच्चूची शक्यता

पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात अजिंक्य रहाणेने ३५ धावा, तर दुसऱ्या डावात ४ धावा केल्या होत्या. गेल्या काही काळापासून अजिंक्य रहाणेला फॉर्म सापडत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये रहाणेला विराटच्या उपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणेला टीम इंडियातील स्थान गमवाण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त मयंक अग्रवाल किंवा चेतेश्वर पुजारा या दोघांपैकी देखील कोणालाही बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. आता हे पाहणे महत्वाचे आहे की, अजिंक्य रहाणेला शेवटच्या कसोटी सामन्यात संधी मिळेल का नाही यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

रिद्धीमान साहाच्या खेळावर सस्पेन्स

पहिल्या कसोटी सामन्यात विकेटकिपर रिद्धीमान साहाने अर्धशतक करून चांगल्या खेळाचे प्रर्दशन केले. या सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला. उद्याच्या सामन्यात तब्बेत ठीक न झाल्यास त्याच्या जागी के.एस. भरतला संभाव्य संघात स्थान मिळू शकतो.

असा असू शकेल भारताचा संघ

शुभ्मन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कप्तान), श्रेयस अय्यर, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव.

हेही वाचा

Back to top button