मिरज : मुसळधार पावसात कोंगनोळी, सलगरे येथील द्राक्ष बागा कोसळल्या

मिरज : मुसळधार पावसात कोंगनोळी, सलगरे येथील द्राक्ष बागा कोसळल्या
मिरज : मुसळधार पावसात कोंगनोळी, सलगरे येथील द्राक्ष बागा कोसळल्या
Published on
Updated on

लिंगनूर : पुढारी वृत्तसेवा

आज (दि. 2) पहाटे दोन ते सकाळी साडेआठ पर्यंत पडलेल्या मुसळधार पावसात कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) मधील 11 सलगरे (ता. मिरज) येथील 1 अशा एकूण 12 द्राक्ष बागा कोसळल्या आहेत. आज प्राथमिक स्तरावर ही माहिती मिळाली आहे. तर कोंगनोळी मधील 500 एकर, सलगरे मधील 200 एकर तर पूर्व भागातील लिंगनूर, खटाव, बेळंकी, संतोषवाडी, विकासनगर, कदमवाडी यांसह सर्वच गावांत किमान 200 एकर ते कमाल 500 एकर क्षेत्रास या पावसाचा झटका द्राक्ष बागा व बागायतदार यांना बसला आहे.

पावसामुळे माती पूर्ण भिजून वाहून गेली तसेच घडांचे ओझे न पेलल्याने या बागा सकाळपर्यंत कोसळल्या होत्या. काही उत्पादकांनी महागडा प्लास्टिक कागद अंथरून बागा वाचवण्यासाठी धडपड केली पण साचलेल्या पाण्याचे ओझेही काही ठिकाणी वाढून बागेतील ओळी भुईसपाट झाल्या आहेत. तर उर्वरित सर्व बागांनाही घडात पाणी साचल्याने आता उद्या कुज, मणी तडकून नुकसान सुरू होणार आहे. तर काही बागा फुलोऱ्यात होत्या त्याही कुजून घडपूर्ण गळणार आहेत. मागील आठवड्यात सुद्धा झालेल्या तासभर पावसात काही बागा कुजून अक्षरशः दुर्गंधी सुटली आहे. आता उद्यापासून हीच गत हजारो एकर क्षेत्रात दिसून येणार आहे. एकरी 3 लाख रुपयांचे नुकसान असून एकेका गावात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

कोंगनोळीमधील काढणीला आलेल्या बागा वाया

कोंगनोळी येथील नुकसानग्रस्त शेतीस भेट द्यायला गेले असता नुकसानग्रस्त शेतकरी 1800 एकर पैकी 500 एकर बाधित क्षेत्र, दहा ते बारा बागा थेट पडल्या आहेत. यामध्ये शंकर दुधाळे, विजय शिकारखाने, मुकुंद शिकारखाणे, महादेव शिकारखाने, नंदकुमार ढवळे, बापू माने, बाळू मोरे, अशोक बेडगे सर यांच्यासह आणखी शेतकऱ्यांचा समावेश आहे. सलगरे मधील आप्पासाहेब कोष्टी, नंदकुमार मगदुम, संभाजी पाटील यासह अनेक शेतकऱ्यांचे 90 टक्के बागेचे नुकसान झाले आहे. पैकी काहींनी नुकसान बाबत माहिती दिली. अनेकांच्या बागा पाऊस जमिनीत मुरून व घडांचे ओझे वाढून पडल्या आहेत.

आज अनेक उत्पादक दिवसभर बागेत साचलेले पाणी काढण्यात, घड झाडण्यात, बांध फोडणे, पाणी बाहेर काढणे यामध्ये तर काहीजण बाग पावसाळ्यात वाचली असली तरी रोग येऊ नयेत म्हणून औषध फवारणी मध्ये व्यस्त होते. दरम्यान येथील ग्रामस्थ शिवाजी जाधव यांनी द्राक्ष बागांच्या नुकसानीची माहिती कृषी खात्यास याची माहिती दिली आहे.

सलग तीन वर्षे नुकसानीच्या खाईत द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे. पाऊस, लॉकडाऊन, पाऊस, बागा फेल जाणे, दर नसणे अशी अनेक संकटे झेलत शेतकरी पुन्हा तिसऱ्या वर्षी उभा राहण्याची धडपड करीत होता. पण सलग तिसऱ्या वर्षी झटका बसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी उद्धवस्त झाला आहे.

सचिन मगदुम, नुकसानग्रस्त शेतकरी (लिंगनूर)

पडलेली बाग उभा करायला, आणि खराब झालेले घड काढून टाकायला पुन्हा मजूर लावायला लागतात नुकसान होऊनही पुन्हा पुढील खर्च सुरूच राहतो.

अशोक बेडगे, नुकसानग्रस्त शेतकरी (कोंगनोळी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news