येवला : अवकाळी पावसाने गारठून तब्बल ४८ मेंढ्या आणि तीन वासरे मृत्यूमुखी | पुढारी

येवला : अवकाळी पावसाने गारठून तब्बल ४८ मेंढ्या आणि तीन वासरे मृत्यूमुखी

येवला; पुढारी वृत्तसेवा

थंडीची सुरुवात आणि त्यात अचानक बेमोसमी व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे व मेंढापाळांचे मोठे नुकसान होत आहे. गुरुवारी या वातावरणाचा मुक्या जनावरांना देखील फटका बसताना दिसत आहे.

येवला तालुक्यातील सोमठानदेश या गावातील राजाराम बाळू सोनवणे व दशरथ चंद्रभान सोनवणे यांच्या प्रत्येकी सहा अशा एकूण १२ मेंढ्या, तर राजापूर येथील राजाराम तुकाराम वाघमोडे यांच्या २४ मेंढ्या, भारम येथील रतन कारभारी लवंगे यांच्या ५ मेंढ्या , पिंपलखुटे येथील ३ संतोष सारवंद दहीने यांच्या ७ मेंढ्या तर कुसुमाडी येथील गोरख तुकाराम बारहाते यांची ३ वासरे या अवकाळी पावसाने व वातावरणात झालेल्या गारव्यामुळे गारठून मृत्यूमुखी पडली आहेत.

या सदर्भात तहसीलदार प्रमोद हिले, पालकमंत्री भुजबळ यांचे स्विय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा करून शवविच्छेदन करण्याच्या सूचना दिल्या. झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाला पाठवून नियमानुसार मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचलं का ?

Back to top button