बिग बॉस मराठी ३ : जय- मीरा VS गायत्री; घरामध्ये रंगणार कॅप्टन्सी टास्क - पुढारी

बिग बॉस मराठी ३ : जय- मीरा VS गायत्री; घरामध्ये रंगणार कॅप्टन्सी टास्क

मुंबई; पुढारी ऑनलाईन : जय – मीरा VS गायत्री : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज कॅप्टन्सी टास्क रंगणार आहे. पुढच्या आठवड्यात घराचा कॅप्टन कोण बनणार? याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. घरातील प्रत्येक सदस्य यासाठी खूप मेहनतीने तयारी करणार हे निश्चित आहे. बघूया कोण बनणार पुढील आठवड्यात घराचा कॅप्टन.

टास्क दरम्यान सदस्यांमध्ये राडे, वादविवाद, धक्काबुक्की आणि भांडण झाली नाही तर टास्क पूर्ण कसा होणार नाही का ? टास्कमध्ये जय – मीरा VS गायत्री असं चित्र दिसणार आहे. यांच्यातील वाद काही संपायचे नावं घेत एकंदरीत असे दिसतं आहे.

बिग बॉस यांनी कॅप्टन पदाचे नवे उमेदवार निवडण्याची वेळ आली आहे असे आज जाहीर केले आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसते आहे की, टास्क दरम्यान जय गायत्रीला म्हणताना दिसणार आहे, ‘गायत्री दातार तू भेड चाल मध्येच खेळतेस..’ त्यावर गायत्रीने उत्तरं दोताना म्हटले की, ‘चोराच्या उलट्या बोंबा आहेत.’

यावर मीरा पण लगेच म्हणाली, कोणाच्या मागे बुगुबुगू करतेस ना हे कळतं. गायत्रीला राग अनावर झालं आणि ती मीराला म्हणाली, ‘अगं निघ गं… तू हड…’

बघूया हा वाद इथेच संपला की पुढे अजून राडे झाले. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

हेही वाचलंत का? 

Back to top button