MI vs RCB : बुमराहच्या माऱ्यात बंगळुरू उद्वस्त; मुंबईला 197 धावांचे लक्ष्य | पुढारी

MI vs RCB : बुमराहच्या माऱ्यात बंगळुरू उद्वस्त; मुंबईला 197 धावांचे लक्ष्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या 25 व्या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून मुंबईविरुद्ध 196 धावा केल्या. बेंगळुरूकडून फाफ डुप्लेसिसने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 61 धावांची दमदार खेळी केली. तर रजत पाटीदारने अर्धशतकी खेळी केली. सामन्यात विराट कोहलीला केवळ तीन धावा करता आल्या. 14 धावांवर बुमराहने त्याला आपला शिकार बनवले. बुमराहने कोहलीला आयपीएलमध्ये पाचव्यांदा बाद केले. विल जॅकच्या रूपाने संघाला दुसरा धक्का बसला. पदार्पणाच्या सामन्यात जॅकला केवळ आठ धावा करता आल्या. तो 23 धावांवर आकाश मधवालने बाद केला. (MI vs RCB)

यानंतर फाफ डुप्लेसिस आणि रजत पाटीदार यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची मोठी भागीदारी झाली, जी गेराल्ड कोएत्झीने मोडली. इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या पाटीदारला त्याने यष्टीरक्षकाकडून झेलबाद केले. अर्धशतकी खेळी खेळून तो बाद झाला. यादरम्यान त्याने 192.30 च्या स्ट्राईक रेटने तीन चौकार आणि चार षटकार मारले. यानंतर लगेचच ग्लेन मॅक्सवेलची विकेट पडली तो शून्यावर बाद झाला.

आरसीबीसाठी बुमराह डोकेदुखी ठरला. त्याने तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कर्णधार फाफ डुप्लेसिसला टिम डेव्हिडकरवी झेलबाद केले. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बुमराहने महिपाल लोमराला एलबीडब्ल्यू आऊट केले. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.
यानंतर बुमराहने पुन्हा 19व्या षटकात लागोपाठ दोन चेंडूत दोन विकेट घेतल्या. त्याने सौरव चौहान आणि विजयकुमार विशाक यांना बाद केले. यासह त्याने पाच विकेट्स मिळवण्याची कामगिरी केली. तर दिनेश कार्तिकने दमदार कामगिरी केली. त्याने 22 चेंडूत 21 वे अर्धशतक पूर्ण केले. 23 चेंडूत 53 धावा करून तो नाबाद राहिला. या दरम्यान त्याने स्ट्राईक रेटने पाच चौकार आणि चार षटकार ठोकले. तर आकाश दीप दोन धावा करून नाबाद राहिला. मुंबईतर्फे बुमराहने पाच तर गेराल्ड कोएत्झी, आकाश मधवाल आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दोन्ही संघात बदल

मुंबईने पीयूष चावलाच्या जागी श्रेयस गोपालला संघात स्थान दिले आहे. तर आरसीबीने संघात तीन बदल केले आहे. विल जॅक, महिपाल लोमरोर आणि विजयकुमार व्यासक यांना संघात संधी मिळाली आहे. या सामन्यात विल जॅकला पदार्पणाची संधी मिळाली आहे. या सामन्यात मुंबई टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी आणि गेराल्ड कोएत्झी या चार परदेशी खेळाडूंसोबत खेळताना दिसत आहे. त्याचवेळी आरसीबीने विल जॅक, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर आणि रीस टोपले यांच्या रूपाने चार विदेशी खेळाडूंना मैदानात उतरवले आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार विशाक, मोहम्मद सिराज, आकाश दीप.

इम्पॅक्ट प्लेयर : सुयश प्रभुदेसाई, सौरव चौहान, स्वप्नील सिंग, राजन कुमार, कर्ण शर्मा.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, आकाश मधवाल.

इम्पॅक्ट प्लेयर : सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, नमन धीर, नेहल वढेरा, हार्विक देसाई.

हेही वाचा :

Back to top button