IPL 2024 : गुजरातसमोर चेन्नईचे 207 धावांचे आव्हान | पुढारी

IPL 2024 : गुजरातसमोर चेन्नईचे 207 धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या 17 व्या हंगामातील सातव्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना गुजरात टायटन्सशी होत आहे.  सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्ससमोर 207 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना CSK ने 20 षटकात 6 गडी गमावून 206 धावा केल्या. शिवम दुबेने 23 चेंडूत 51 धावांची तुफानी खेळी केली. तर शेवटच्या ओव्हरमध्ये समीर रिझवीने सहा चेंडूंत दोन षटकारांच्या मदतीने 14 धावा केल्या. आयपीएल कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर फाइन लेगवर षटकार ठोकला. त्याचवेळी ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांनीही शानदार खेळी केली, मात्र त्यांना अर्धशतक झळकवता आले नाही. हुकले.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नईने डावाची आक्रमक सुरुवात चांगली केली. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांनी संघाला झंझावाती सुरुवात करून दिली. दोघांनी 32 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली. यामध्ये रचिनचे योगदान 20 चेंडूत 46 धावांचे होते. यादरम्यान रचिनने सहा चौकार आणि तीन षटकार लगावले. त्याचा स्ट्राइक रेट 230 होता.

त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला अजिंक्य रहाणे पुन्हा फ्लॉप झाला. त्याने कर्णधार ऋतुराजसोबत दुसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. रहाणे 12 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. ऋतुराजचे कर्णधार म्हणून पहिले अर्धशतक हुकले. तो 36 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 46 धावा करून बाद झाला. मात्र, यानंतर शिवम दुबेने चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर धुमाकूळ घातला. तो येताच आर साई किशोरच्या चेंडूवर षटकार ठोकला. शिवमने अवघ्या 22 चेंडूत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सातवे अर्धशतक झळकावले.

मात्र, अर्धशतक झळकावल्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली. दुबेने 23 चेंडूंत दोन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 51 धावांची खेळी केली. दुबेने चौथ्या विकेटसाठी डॅरिल मिशेलसोबत 57 धावांची भागीदारी केली. दुबे बाद झाल्यानंतर यूपीचा समीर रिझवी फलंदाजीला आला आणि त्यानेही छोटी पण उपयुक्त खेळी खेळली. त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर रिझवीने जगातील सर्वोत्कृष्ट टी-20 फिरकी गोलंदाज रशीदला षटकार ठोकला.

यानंतर त्याच षटकात आणखी एक षटकार लागला. तो सहा चेंडूंत दोन षटकारांच्या मदतीने 14 धावा करून बाद झाला. 20 चेंडूत 24 धावा केल्यानंतर मिचेल नाबाद राहिला. त्याचवेळी तीन चेंडूत सात धावा करून जडेजा धावबाद झाला. गुजरातकडून राशिदने दोन बळी घेतले. तर साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन आणि मोहित शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Back to top button