टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी लोकसभा लढवणार? भाजपची 'या' जागेवर उमेदवारी देण्याची तयारी | पुढारी

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी लोकसभा लढवणार? भाजपची 'या' जागेवर उमेदवारी देण्याची तयारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने नुकतीच त्यांची १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीनंतर आता आणखी नावांची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप शमीला तिकीट देणार असल्याची शक्यता आहे.

‘आज तक’ या माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, भाजप मोहम्मद शमीला निवडणुकीत उतरवण्याचा विचार करत आहे. मात्र, शमीने अद्याप याबाबत कोणताही निर्णय जाहीर केला नाही. पण सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले की, मोहम्मद शमी पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवेल अशी माहिती आहे. बंगालमधील बसीरहाट लोकसभा मतदारसंघातून भाजप शमीला उमेदवारी देऊ इच्छित आहे. सध्या या जागेवरून तृणमूल काँग्रेसच्या नुसरत जहाँ या खासदार आहेत. संदेशखळीचा परिसरही या लोकसभा मतदारसंघात येतो. ही तीच संदेशखळी आहे, जिथे अलीकडेच मोठ्या संख्येने महिलांनी टीएमसीचे माजी नेते शाहजहान शेख आणि इतरांवर छेडछाडीचे आरोप केले होते. अनेक दिवसांच्या आंदोलनानंतर अखेर शहाजहानला नुकतेच अटक करून सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले.

हेही वाचा

Back to top button