Ind vs Eng 2nd Test : शुभमन गिलचे शानदार शतक | पुढारी

Ind vs Eng 2nd Test : शुभमन गिलचे शानदार शतक

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलने विशाखापट्टणम कसोटीत शानदार शतक झळकवले. त्याच्या शतकी खेळीमुळे भारताने धावांचा मजबूत आघाडी घेतली आहे. गीलने १३२ चेंडूत शतक केले. या शतकी खेळीत त्याने ११ चौकार आणि २ षटकार ठोकले. गिलचे हे तिसरे कसोटी शतक आहे.  अक्षर पटेल आणि गील या जोडीने ७९ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे.

 

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे सुरू आहे. या सामन्याचा आज (दि.४) तिसरा दिवस आहे. भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत आहे.

हेही वाचा 

Back to top button