IND vs ENG 2nd Test : बुम बुम बुमराह! इंग्‍लंडची ‘त्रेधा’, पहिला डाव 253 धावांवर गुंडाळला

IND vs ENG 2nd Test : बुम बुम बुमराह! इंग्‍लंडची ‘त्रेधा’, पहिला डाव 253 धावांवर गुंडाळला

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने सर्वबाद 396 धावा केल्या. आज इंग्‍लंडच्‍या पहिल्‍या डावाला भारताचा वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराह याने खिंडार पाडले. त्‍याने सहा विकेट घेतल्याने इंग्‍लंडचा पहिला डाव 253 धावांवर आटाेपला. इंग्‍लंडचा संघ 143 धावांनी पिछाडीवर आहे. (IND vs ENG 2nd Test)

भारताच्‍या पहिल्‍या डावात युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने द्विशतक झळकावून शानदार कामगिरी केली. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने डावाची सुरूवात आक्रमक केली. इंग्लंडने पहिला 6 ओव्हरमध्ये बिनबाद 32 धावा लावल्या होत्या. यानंतर 20 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून इंग्लंडने 112 धावा केल्या. (IND vs ENG 2nd Test) यानंतर इंग्लंडच्या विकेट पडत राहिल्या. भारताच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचे गोलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत.

झॅक क्रॉली-बेन स्टोक्सकडून डाव सावरण्‍याचा प्रयत्‍न

झॅक क्रॉली आणि बेन स्टोक्सने धावामध्ये भर घालण्याचा प्रयत्न केला. सलामीवीर झॅकने सुरूवातीपासून आक्रमक खेळी करत धाव लक हालता ठेवला. त्याने आपल्या खेळीत 76 धावा केल्या. तर बेन स्टोक्सने 47 धावांची खेळी करून इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु बुमराहने त्याला क्लीन बोल्ड करत तंबूत धाडले. क्रॉली- स्टोक्स यांच्या व्यतिरिक्त इंग्लंडच्या फलंदाजांना विशेष कामगिरी करता आली नाही. यामध्ये डकेट 21, ओली पोप 23, जो रूट 5, जॉनी बेअरस्टो 25, फोक्स 6, रेहान अहमद 6, टॉम हार्टली 21,
जेम्स अॅंडरसन 6 तर शोएब बशिर 8 धावांवर नाबाद राहिला. (IND vs ENG 2nd Test)

बुमराहचा भेदक मारा, कुलदीपच्‍या फिरकीसमाेर इंग्‍लंड निष्‍प्रभ

बुमराहचा तिखट मारा आणि कुलदीपच्या फिरकीसमोर इंग्लंडचा संघ विशेष कामगिरी करू शकला नाही. सामन्यात बुमराहने 6, कुलदीप यादवने 3 तर अक्षर पटेलने 1 विकेट घेतली. (IND vs ENG)

भारताचा पहिला डाव

इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पहिल्या डावात सहा गडी गमावून ३३६ धावा केल्या. यामध्ये भारतीय संघाची सलामी जोडी मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली. भारतीय संघाचा कर्णधार अवघ्या 14 धावा करून परतला. परंतु, यशस्वी जैस्वालने संयमी खेळी करत पहिल्या डावात 179 धावांवर नाबाद आहे. तर, रविचंद्रन अश्विन पाच धावांवर नाबाद आहे. (IND vs ENG 2nd Test)

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली होती. रोहितने यशस्वीसह पहिल्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. परंतु रोहित 14 धावा करून बाद झाला. यानंतर यशस्वीने शुभमन गिलसह दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या शुभमन पुन्हा निराशाजनक कामगिरी केली. तो 34 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार मारले. श्रेयस अय्यर २७ धावा करून झेलबाद झाला. आऊट होण्यापूर्वी श्रेयसने यशस्वीसोबत ९० धावांची भागीदारी केली. कसोटी पदार्पण करणारा रजत पाटीदारने 32 धावांची खेळी केली आणि तो दुर्दैवाने बाद झाला. त्याने यशस्वीसोबत 70 धावांची भागीदारी केली. त्यानंतर यशस्वीने अक्षरसोबत 52 धावांची भागीदारी केली. यामध्ये अक्षरने 27 धावा केल्या.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news