Unmukt Chand-simran khosla marriage: वर्ल्डकप जिंकून देणारा उन्मुक्त चंद विवाहबंधनात

पुढारी ऑनलाईन :

भारताला १९ वर्षांखालील क्रिकेट  विश्वचषक जिंकून देण्यात फलंदाज उन्मुक्त चंदने मोलाचा वाटा उचलला होता. आता तो फिटनेस कोच सिमरन खोसलासोबत विवाहबंधनात अडकला. (Unmukt Chand-simran khosla marriage) त्याने ट्विटरवर लग्नाते काही फोटो शेअर करून लग्नाची माहिती दिलीय. उन्मुक्त चंदचा विवाह सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. (Unmukt Chand-simran khosla marriage)

लग्नात त्याने पिंक कलरची शेरवानी घातली होती. तर सिम्रनने पारंपरिक कुमाउनी पिचोरा परिधान केला होता.  तिने मेकअपदेखील साधा केला होता. खूप हेवी ज्वेलरी न घालता तिने हलका मांग टीका आणि नथ घातली होती.

सिमरन खोसलाचा जन्म ९ सप्टेंबर, १९९३ रोजी झाला होता. ती उन्मुक्तपेक्षा केवळ ५ महिने १४ दिवसांनी लहान आहे. सिमरन एक फिटनेस ॲण्ड न्यूट्रीशन कोच आहे. ती ‘Buttlikeanapricot’ कंपनीची मालकिण आणि संस्थापिका आहे. ती आपल्या वर्कआउटवर पूर्ण लक्ष देते.

उन्मुक्तने फिटनेस आणि स्पोर्ट्स न्युट्रिशन कोच सिमरन खोसलासोबत लग्न केलंय. त्याने यावर्षी भारतीय क्रिकेट सोडत अमेरिकेमधून खेळण्याचा निर्णय घेतला होता. आता तो बिग बॅशमध्येही खेळताना दिसणार आहे. उन्मुक्त ऑस्ट्रेलियातील बिग बॅश टी-२० मध्येही खेळणार आहे. या स्पर्धेत तो मेलबर्न रेनेगेड्स संघाकडून खेळणार आहे.

हेही वाचलं का?

Exit mobile version