IND vs ENG Test Series : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून बुमराह-सिराजला विश्रांती? ‘या’ गोलंदाजांना मिळू शकते पदार्पणाची संधी | पुढारी

IND vs ENG Test Series : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून बुमराह-सिराजला विश्रांती? ‘या’ गोलंदाजांना मिळू शकते पदार्पणाची संधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs ENG Test Series : भारत आणि इंग्लंड संघांमध्ये 25 जानेवारीपासून पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच टीम इंडियाची घोषणा करणार आहे. दरम्यान निवद समिती मोठा निर्णय घेणार असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. जो संघ निवडण्यात यणार आहे त्यातून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती दिली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जागी दोन नव्या गोलंदाजांना पदार्पणाची संधी देणात येईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

टीम इंडिया आणि इंग्लिश संघातील कसोटी मालिकेसाठी सर्व चाहते खूप उत्सुक आहेत. उभय संघातील शेवटचा कसोटी सामना 7 मार्चपासून खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. पण आगामी टी-20 विश्वचषक लक्षात घेऊन बीसीसीआय जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देऊ शकते. अशा स्थितीत त्यांच्या जागी दोन युवा खेळाडूंना कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. यात रेल्वेकडून खेळणारा युवराज सिंग आणि कर्नाटककडून खेळणारा वासुकी कौशिक यांचे नाव आघाडीवर आहे, असे सूत्रांकडून समजते आहे. (IND vs ENG Test Series)

5 जानेवारीपासून सुरू झालेल्या रणजी ट्रॉफी 2024 च्या पहिल्याच सामन्यात दोन्ही खेळाडूंनी आपल्या घातक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजवले. युवराजने चंदीगडविरुद्ध खेळताना आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने 11.3 षटकात केवळ 10 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट फक्त 0.87 राहिला. तर वासुकी कौशिकने पंजाबविरुद्ध पहिल्या डावात 41 धावांत 7 विकेट घेतल्या. या दोन्ही गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल बीसीसीआयच्या निवड समितीकडून घेण्यात आली असून अगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यांना खेळण्याची संधी मिळू शकते. (IND vs ENG Test Series)

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी : 25-29 जानेवारी (हैदराबाद)
दुसरी कसोटी : 2-6 फेब्रुवारी (विशाखापट्टणम)
तिसरी कसोटी : 15-19 फेब्रुवारी (राजकोट)
चौथी कसोटी : 23-27 फेब्रुवारी (रांची)
पावची कसोटी : 7-11 मार्च (धर्मशाला)

Back to top button