ENG vs PAK : इंग्लंडचे पाकिस्तानला 338 धावांचे लक्ष्य | पुढारी

ENG vs PAK : इंग्लंडचे पाकिस्तानला 338 धावांचे लक्ष्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडने पाकिस्तानला विजयासाठी 338 धावांचे लक्ष्य दिले आहे. इंग्लंडने 50 षटकांत 9 बाद 337 धावा केल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 84, जो रूटने 60 आणि जॉनी बेअरस्टोने 59 धावा केल्या. डेव्हिड मलानने 31, हॅरी ब्रूकने 30 आणि जोस बटलरने 27 धावा केल्या. डेव्हिड विलीने 15 धावांचे योगदान दिले. मोईन अलीला फक्त आठ धावा करता आल्या तर ख्रिस वोक्सने चार धावा केल्या. गस अॅटिंकसनला खातेही उघडता आले नाही. पाकिस्तानकडून हरिस रौफने सर्वाधिक तीन बळी घेतले. शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम ज्युनियर यांना प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर इफ्तिखार अहमदने एक विकेट घेतली.

हेही वाचा :

Back to top button