Asian Para Games | सुहास यथीराजने जिंकले भारतासाठी २३ वे सुवर्ण

Asian Para Games
Asian Para Games
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : एशियन पॅरा गेम्समध्ये सुहास यथीराज याने पॅरा बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकले. पुरूष एकेरी SL4 स्पर्धेत मलेशियाच्या खेळाडूचा पराभूत करत सुहासने भारतासाठी २३ वे सुवर्णपदक जिंकले आहे. सुहासचा मलेशियाविरुद्ध हा पहिलाच विजय आहे. मलेशियाच्या मोहम्मद अमीन विरुद्ध 2-1 स्कोअरसह सुहासने सुवर्णपदकावर मोहर उमटवली.

एशियन पॅरा गेम्समध्ये आतापर्यंत भारताच्या खेळाडूंनी एकूण ९३ पदके जिंकली आहे. यामध्ये २३ सुवर्ण, २७ रौप्य, ४३ कांस्य पदकाची भारतीय खेळाडूंकडून कमाई करण्यात आली आहे.

बॅडमिंटनमध्ये भारताचा डबल धमाका, प्रमोद भगतला सुवर्ण, नितेश कुमारला रौप्य

एशियन पॅरा गेम्सच्या पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंची सुवर्ण कामगिरी कायम आहे. पॅरा-शटलर प्रमोद भगतने चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला २१ वे सुवर्णपदक जिंकून दिले. प्रमोद भगतने बॅडमिंटनमध्ये पुरुषांच्या SL3 प्रकारातील रोमहर्षक लढतीत भारताच्याच नितेश कुमारचा २२-२०, १८-२१, २१-१९ असा पराभव केला आणि सुवर्ण जिंकले. तर नितेश कुमारला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

तर बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीच्या SH6 प्रकारात कृष्णा नगर याने रौप्यपदकाची कमाई केली. कृष्णा नगरने पॅरा बॅडमिंटन पुरुष एकेरी – SH6 प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत हाँगकाँगच्या काई मान चू विरुद्धच्या लढतीत रौप्यपदक मिळवले.

दरम्यान, तिरंदाजीत महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंडमध्ये शीतल देवीने आणखी एक सुवर्ण जिंकले. तिने अंतिम फेरीत सिंगापूरच्या अलीम नूर स्याहिदा हिला १४४-१४२ अशा गुणांनी हरवले. शीतल देवीचे हे आशियाई पॅरा गेम्समधील तिसरे पदक आहे.

तसेच आशियाई पॅरा गेम्समध्ये पुरुषांच्या १५०० मीटर- T38 धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या रमण शर्मा याने सुवर्ण कामगिरी केली. रमण शर्माने अंतिम फेरीत ४:२०.८० मिनिटांच्या वेळेसह नवा आशियाई विक्रम नोंदवत सुवर्ण जिंकले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news