Asian Para Games 2023 | बॅडमिंटनमध्ये भारतीयांचा दबदबा, तुलसीमथी मुरुगेसनने जिंकले सुवर्ण | पुढारी

Asian Para Games 2023 | बॅडमिंटनमध्ये भारतीयांचा दबदबा, तुलसीमथी मुरुगेसनने जिंकले सुवर्ण

पुढारी ऑनलाईन : आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय बॅडमिंटन खेळाडू तुलसीमथी मुरुगेसन चॅम्पियन ठरली आहे. मुरुगेसनने चीनच्या यांग क्विक्सिया हिचा २१-१९, २१-१९ असा पराभव करत बॅडमिंटनच्या SU5 प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तिने दुसऱ्या गेममध्ये ५-१६ पिछाडीवरुन पुनरागमन करत २१-१९ असा विजय मिळवला. याआधी मुरुगेसनने बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरी SL3-SU5 इव्हेंटमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती. आता तिने दुसरे पदक मिळवले आहे. (Asian Para Games 2023)

संबंधित बातम्या

आज तुलसीमथी मुरुगेसनने भारताला २२ सुवर्णपदक जिंकून दिले. याआधी आज पॅरा शटलर प्रमोद भगतने आशियाई पॅरा गेम्स २०२३ मध्ये पुरुषांच्या SL3 प्रकारात भारताच्याच नितेश कुमारचा २२-२०, १८-२१, २१-१९ असा पराभव करून भारताला २१ वे सुवर्णपदक जिंकून दिले होते.

पॅरा ॲथलीट रमण शर्माने देखील एक नवीन आशियाई आणि क्रीडा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने पुरुषांच्या १५०० मीटर T38 स्पर्धेत ४:२०.८० मिनिटांच्या उल्लेखनीय वेळेसह सुवर्णपदक मिळवले.

भारताने पॅरा गेम्समध्ये आतापर्यंत २२ सुवर्ण, २७ रौप्य, ४३ कांस्य मिळून एकूण ९२ पदके मिळवली आहेत. पदकतालिकेत भारत चौथ्या क्रमाकांवर पोहोचला आहे.

हे ही वाचा :

Back to top button