SA vs BAN World Cup 2023 | द. आफ्रिकेचे बांगलादेशचे ३८३ धावांचे लक्ष्य | पुढारी

SA vs BAN World Cup 2023 | द. आफ्रिकेचे बांगलादेशचे ३८३ धावांचे लक्ष्य

पुढारी ऑनलाईन :   सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णय घेतलेल्या द. आफ्रिकेने ३८३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आफ्रिकेच्या डावाची सुरुवात खराब झाली. रीझ हेंड्रिक्स १२ धावा तर रॅसी व्हॅन दर दुसेन एक धावा काढून बाद झाला. यानंतर क्विंटन डी कॉकने कर्णधार एडन मार्करामसोबत तिसऱ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी केली. डी कॉकने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील २० वे शतक आणि या विश्वचषकातील तिसरे शतक झळकावले. त्याचवेळी, मार्करामने आपल्या वनडे कारकिर्दीतील नववे अर्धशतक झळकावले. ही भागीदारी साकिबने तोडली. मार्कराम ६९ चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने ६० धावा करून बाद झाला. (SA vs BAN World Cup 2023)

आपल्या १५० व्या एकदिवसीय सामन्यात डी कॉकने १४० चेंडूत १५ चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने १७४ धावांची खेळी केली. या विश्वचषकातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता. त्याने पाकिस्तानविरुद्ध १६३ धावांची इनिंग खेळली होती. यानंतर हेनरिक क्लासेनने ३४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. क्लासेन आणि डी कॉकमध्ये १४१ धावांची भागीदारी झाली. क्लासेनने ४९ चेंडूंत दोन चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने ९० धावांची खेळी केली. डेव्हिड मिलरने १५ चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ३४ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. तर मार्को जॅनसेन एक धाव घेत नाबाद राहिला. (SA vs BAN World Cup 2023)

गोलंदाजीमध्ये बांगलादेशकडून हसन महमूदने २ तर, मेहंदी हसन मिराज, इस्लाम आणि शाकिब अल हसन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

Back to top button