KL Rahul : केएल राहुल आयपीएल आणि डब्ल्यूटीसी फायनलमधून बाहेर | पुढारी

KL Rahul : केएल राहुल आयपीएल आणि डब्ल्यूटीसी फायनलमधून बाहेर

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाच्या मिशन ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला’ (World Test championship) मोठा धक्का बसला आहे. आयपीएल सुरु असतानाच टीम इंडियासाठी (Team India) ही मोठी बातमी समोर आली आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आयपीएलमधून (IPL 2023) बाहेर पडला आहे. दरम्यान, त्याच्या अनुपस्थितीमध्ये कृणाल पंड्या (Krunal Pandya) लखनौ संघाचे नेतृत्व करणार आहे.

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मार्कस स्टोयनिसच्या चेंडूवर फाफ डुप्लेसिसने कव्हर ड्राईव्ह मारला होता. तेव्हा राहुलला चौकार रोखताना दुखापत झाली. राहुल आज चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या लढतीनंतर गुरुवारी स्कॅनसाठी मुंबईत येणार आहे.

दरम्यान, केएल राहुल (KL Rahul) हा पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे. WTC फायनल 7 जून पासून इंग्लंड येथे ओव्हल मैदानावर रंगणार आहे. या सामन्याला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर झालेला असून, राहुल सुद्धा टीमचा भाग आहे. मात्र, तो या सामन्यापर्यंत फिट होईल असे वाटत नसल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे BCCI च्या चिंतेत वाढ झाली आहे.

राहुलला विश्रांती देणे योग्य : बीसीसीआय

केएल राहुल हा टीम इंडियाचा महत्त्वपूर्ण सदस्य आहे. त्यामुळे दुखापतीतून लवकर सारवरण्यासाठी आयपीएलमध्ये पुढच्या सामन्यात त्याला विश्रांती देणे योग्य राहिल, वैद्यकीय तपासणीनंतर त्याच्या दुखापतीचे गंभीरता स्पष्ट होईल त्यानंतर निर्णय घेतला जाईल असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. तो सध्या लखनौ संघाबरोबर आहे. बुधवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यानंतर तो मुंबईत येईल. इथे बीसीसीआयच्या वैद्यकिय पथकाकडून त्याची तपासणी केली जाईल.

उनाडकटची दुखापतही गंभीर

दुसरीकडे जयदेव उनाडकटची दुखापतही गंभीर असल्याचे बोलले जात आहे. जयदेवच्या खांद्याला दुखापत झाली आहे. सुदैवाने त्याचा खांदा डिसलोकेट झाला नसल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. पण सध्या तो आयपीएल खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे.

WTC फायनलसाठी असा आहे भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट

Back to top button