RR vs CSK : राजस्थानचे चेन्नईसमोर २०३ धावांचे आव्हान | पुढारी

RR vs CSK : राजस्थानचे चेन्नईसमोर २०३ धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने-सामने असणार आहेत. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला जात आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सने चेन्नईसमोर २०३ धावांचे आव्हान ठेवले आहे.

राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वालने ४३ चेंडूमध्ये ७७ धावांची खेळी केली. जयस्वलाच्या या खेळीच्या जोरावरच राजस्थानला २०० धावांचा टप्पा पार करता आला. राजस्थानकडून ध्रुव जुरेल १५ चेंडूमध्ये ३४ धावा, जॉस बटलर २१ चेंडूमध्ये २७ धावा, डेवदत्त पडिकल १३ चेंडूमध्ये २३ धावांचे योगदान दिले. तर चेन्नई सुपर किंग्जकडून तुषार देशपांडेने २ तर महिष तीक्ष्णा आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी १ विकेट पटकावली.

हेही वाचलंत का?

Back to top button