BAN vs IND 1st Test Day 2 | ७५ धावांमध्‍ये बांगलादेशचा निम्‍मा संघ तंबूत परतला | पुढारी

BAN vs IND 1st Test Day 2 | ७५ धावांमध्‍ये बांगलादेशचा निम्‍मा संघ तंबूत परतला

ढाका; वृत्तसंस्था :  भारताने बांगला देशविरुद्धच्या पहिल्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 404 धावा केल्या. बांगलादेशच्‍या पहिल्‍या डावाी सुरुवात अत्‍यंत निराशाजनक झाली. एकापाठोपाठ एक असे पाच गडी बांगलादेशने गमावले आहेत. आता फॉलोऑन टाळण्‍यासाठी उर्वरीत फलंदाजांना धडपड करावी लागणार आहे.

भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा

मोहम्‍मद सिराजच्‍या पहिल्‍याच षटकातील पहिल्‍याच चेंडूवर बांगलादेशला धक्‍का बसला. सलामीवीर शान्‍तो याने यष्‍टीरक्षक पंतकडे झोपा झेल दिला. चौथ्‍या षटकामध्‍ये यासिर अली याला त्रिफळाचीत केले. त्‍याने केवळ चार धावांचे योगदान दिले. बांगलादेशने पाच धावांवर दोन गडी गमावले आहेत. मोहम्मद सिराजने बांगलादेशला तिसरा धक्का देत लिटन दासला त्रिफळाचीत केले. सिराजने बांगलादेशला आणखी एक धक्का देत झाकीर हसनची विकेट घेतली. पंतने त्याचा झेल टिपला. झाकीर हसन २० धावा काढून माघारी परतला. यानंतर कर्णधार शाकिब अल हसन हा तीन धावांवर बाद झाला. कुलदीप यादवच्‍या गोलंदाजीवर त्‍याने विराट कोहलीकडे सोपा झेल दिला. भारतीय गोलंदाजांच्‍या भेदक मार्‍यामुळे बांगलादेशचा संघ बॅकफूटवर गेला असून, आता फॉलोऑन टाळण्‍यासाठी उर्वरीत फलंदाजांना धडपड करावी लागणार आहे.

भारताच्‍या पहिल्‍या डावात ४०४ धावा

भारताने बांगला देशविरुद्धच्या शुभारंभी कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 404 धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन या तिघांनी अर्धशतकी खेळी केली. भारताने बुधवारी पहिल्या दिवशी 6 बाद 278 धावा केल्या होत्या. त्यानंतर (BAN vs IND 1st Test Day 2) दुसऱ्या दिवशीच्या खेळाच्या सुरुवातीलाच बांगला देशने भारताला धक्का दिला. इबादोत हुसेनने श्रेयस अय्यरला आउट केले. त्याचे शतक हुकले. तो 86 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर आठव्या विकेटसाठी कुलदीप यादव आणि अश्विन यांनी चांगली भागीदारी केली. अश्विनने अर्धशतक पूर्ण केले. पण मेहदी हसन मिराजने अश्विनला यष्टिचीत केले. अश्विनने 58 धावांची खेळी केली. त्यानंतर पाठोपाठ भारताला आणखा धक्का बसला. कुलदीप यादवला तैजुल इस्लामने पायचीत केले. कुलदीपने 40 धावा केल्या. मेहदीने अखेरची सिराजची विकेट घेतली. मुशफिकुरने त्याचा झेल टिपला. बांगला देशकडून डावखुरा फिरकी गोलंदाज तैजुल इस्लाम आणि अष्टपैलू खेळाडू मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी ४ विकेट घेतल्या. तर इबादोत हुसेन आणि खालेद अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दरम्यान, काल पहिल्या दिवशी यजमानांच्या फिरकीने भारतीय फलंदाजांना नाचवले होते. तथापि, चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यर या जोडीने टिच्चून फलंदाजी करून भारताची लाज राखली होती. पाहुण्या संघाकडून पुजाराने 203 चेंडूंत 90 धावा ठोकल्या. पंतने 45 चेंडूंत 46 धावा ठोकत उत्तम योगदान दिले. पहिल्या दिवसातील अखेरच्या चेंडूवर अक्षर पटेल 14 धावांवर बाद झाला होता.

प्रथम फलंदाजी करणार्‍या भारताची सुरुवात खराब झाली होती. शुभमन गिल आणि कर्णधार के.एल. राहुल या सलामी जोडीने 41 धावांची भागीदारी रचली. मात्र, दोघेही स्थिरावले आहेत असे वाटत असतानाच तैजुल इस्लामने शुभमन गिलला 20 धावांवर बाद केले. पाठोपाठ राहुलदेखील खालेद अहमदच्या गोलंदाजीवर 22 धावा करून त्रिफळाबाद झाला. दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांच्याकडून डाव सावरण्याची अपेक्षा होती. तैजुल इस्लामने कोहलीला उत्कृष्ट फिरकीवर अवघ्या 1 धावेवर पायचित पकडले. (BAN vs IND 1st Test Day 2)

हे ही वाचा :

 

 

Back to top button