fifa world cup 2022 : आता उत्सुकता सेमीफायनलची | पुढारी

fifa world cup 2022 : आता उत्सुकता सेमीफायनलची

दोहा, वृत्तसंस्था : फिफा विश्वचषक (fifa world cup 2022) स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामने आता संपले आहेत. या विश्वचषकातही अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. सुपर 16 च्या फेरीनंतर उपांत्यपूर्व फेरीतही बराच उलटफेर पाहायला मिळाले. इंग्लंड आणि पोर्तुगाल हे संघ विश्वचषकातून बाहेर पडल्याने चाहते अवाक् झाले आहेत. सेमीफायनलमध्ये फ्रान्स, अर्जेंटिना, क्रोएशिया आणि मोरोक्को या संघांनी धडक मारली आहे.

अशा झाल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती :

1) क्रोएशियाने ब्राझीलचा शूटआऊटमध्ये पराभव करत सेमीफायनल गाठली. (4-2)
2) अर्जेंटिना नेदरलँडविरुद्ध विजय मिळवत सेमीफायनलमध्ये दाखल झाली. (4-3)
3) मोरोक्को संघाने पोर्तुगालचा 1-0 ने पराभव करत सेमीफायनल गाठली.
4) फ्रान्सने इंग्लंडचा 2-1 पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक मारली.

अशा होतील सेमीफायनल लढती :

  • मंगळवारी रात्री अर्जेंटिना वि. क्रोएशिया (रात्री 12.30 वा.)
  • बुधवारी रात्री फ्रान्स वि. मोरोक्को (रात्री 12.30 वा.)
  • सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या संघांमध्ये तिसर्‍या स्थानासाठी 17 डिसेंबर 2022 – रात्री 8.30 वाजता, खलिफा इंटरनॅशनल स्टेडियमवर सामना खेळणार आहेत.

अंतिम सामना : (fifa world cup 2022)

अंतिम सामन्यात धडक मारणार्‍या दोन संघांमध्ये रविवार (दि. 18 डिसेंबर) रात्री 8.30 वाजता, लुसैल स्टेडियमवर विश्वचषकासाठी सामना होईल.

Back to top button