नरेंद्र मोदी स्टेडियम गिनिज बुकात | पुढारी

नरेंद्र मोदी स्टेडियम गिनिज बुकात

अहमदाबाद, वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टी-20 सामन्यात सर्वाधिक प्रेक्षक उपस्थितीचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे. याबाबत बीसीसीआयने ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली. आयपीएल 2022 चा अंतिम सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम यावर पार पडला होता. याच सामन्यातील विक्रमी प्रेक्षक संख्येने गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे.

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 29 मे 2022 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम वर इंडियन प्रीमियर लीग 2022 फायनलच्या सामन्याला तब्बल 101,566 लोकांनी हजेरी लावली आणि एक नवीन विश्वविक्रम नोंदवला. याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Back to top button