IND vs PAK : शाहीन आफ्रिदीचा सामना कसा करायचा? सचिनचा भारतीय संघाला सल्ला | पुढारी

IND vs PAK : शाहीन आफ्रिदीचा सामना कसा करायचा? सचिनचा भारतीय संघाला सल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क :  टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) हे दोन ‘सख्खे शेजारी आणि पक्के वैरी’ आतापर्यंत 6 वेळा एकमेकांच्या आमने-सामने आले आहेत. यात पाचवेळा भारताने पाकिस्तानला चारीमुंड्या चित केले; पण पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमध्ये अजिंक्य राहण्याची परंपरा गेल्यावर्षी खंडित झाली. त्यानंतर टी-20 वर्ल्डकपमध्ये आज, दोन्ही देश भिडणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानला हरवून गेल्या विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढण्याचा ‘मौका’ भारताला मिळणार आहे.

शाहीन आफ्रिदीबाबत सचिनचा भारतीय संघाला सल्ला

भारत पाक सामन्यापुर्वी मास्टर ब्लास्टर सचिनने भारतीय संघाला महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. सचिनने भारतीय संघाला सरळ बॅटने खेळण्याचा तसेच ‘V’ मध्ये फटकेबाजी करण्याचा सल्ला दिला आहे. सचिन म्हणाला, शाहीन आफ्रिदी हा एक आक्रमक गोलंदाज आहे. तो विकेट पटकावण्यासाठी गोलंदाजी करतो. तो फुल लेंग्थ गोलंदाजी करत विकेट पटकावण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे त्याच्याविरूद्ध सरळ बॅटने फलंदाजी करणे फायदेशीर ठरेल.

हेही वाचलंत का?

Back to top button