T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, ‘हा’ अष्टपैलू खेळाडू टी-२० विश्वचषकातून बाहेर | पुढारी

T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, 'हा' अष्टपैलू खेळाडू टी-२० विश्वचषकातून बाहेर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू ड्वेन प्रिटोरियस जखमी झाल्याने त्याला टी-२० विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. टी-२० विश्वचषक सुरू होण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना प्रिटोरियस जखमी झाला. हा आफ्रिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. (T20 World Cup)

टी-२० विश्वचषकासाठी अनेक संघ ऑस्ट्रेलियात पोहचले आहेत. तर काही संघ विश्वचषकापूर्वी काही सामने खेळत आहेत.
दरम्यान, ड्वेन प्रिटोरियस दुखापतीमुळे भारताविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेबरोबरचं विश्वचषकातूनही बाहेर पडला आहे. त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली, असल्याची माहिती गुरूवारी (दि ६)आफ्रिका क्रिकेट बोर्डाकडून देण्यात आली आहे. या दुखापतीमुळे त्याला अनेक दिवस क्रिकेटपासून लांब रहावे लागणार आहे. (T20 World Cup)

३३ वर्षीय ड्वेन प्रिटोरियस दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी महत्वपूर्ण खेळाडू म्हणून समोर आला आहे. आफ्रिकन संघासाठी त्याची कामगिरीही दमदार राहिली आहे. ड्वेन प्रिटोरियस भारताविरुद्धच्या मालिकेसाठी आफ्रिकेच्या संघाचा भाग होता. मात्र, दुखापतीमुळे तो आता विश्वचषक खेळू शकणार नाही. (T20 World Cup)

टी-२० विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ (T20 World Cup) – टेम्बा बवुमा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, हेन्री क्लासेन, रिजा हेंड्रिक्स, केशव महाराज, अॅडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, एर्निक नोर्किया, वेन पार्नेल, कगिसो रबाडा, रिली रोसो, तबरेज़ शम्सी, टी. स्टब्स

हेही वाचलंत का?

Back to top button