Shiv Sena Twitter : ५० खोक्यांचा खोकासूर... बदललेला रावण; ठाकरे सेनेचा शिंदे सेनेवर हल्लाबोल | पुढारी

Shiv Sena Twitter : ५० खोक्यांचा खोकासूर... बदललेला रावण; ठाकरे सेनेचा शिंदे सेनेवर हल्लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shiv Sena Twitter : बुधवारी शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा पारंपारिक दसरा मेळावा पार पडला. हा मेळावा शिंदे गटावरील आरोप प्रत्यारोपांनी गाजला. शिवसेनेच्या ट्विटर अकाऊंटवरून (Shivsena Twitter) एक पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये ५० खोक्यांचा खोकासूर असा रावण आताच्या काळातील आहे अशी टीका बंडखोरांवर करण्यात आली आहे. या ट्वीटची चर्चा सध्या जोरदार आहे.

परंपरेनुसार दसरा मेळाव्यानंतर रावण दहन झाले… पण यावेळचा रावण वेगळा होता. जसा काळ बदलतो तसा रावण ही बदललेला आहे. दहा डोक्याचा नाही तर 50 खोक्यांचा खोकासूर आहे, धोकासूर आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अशी पोस्ट करण्यात आली आहे.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर दोन गटांचा दसरा मेळावा कुठे पार पडणार हा पेचप्रसंग निर्माण झाला होता. . पण शिवाजी पार्कवर ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर मेळाव्याची परवानगी देण्यात आली. यानंतर याठीकाणी पार पडलेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केलेल्या टिकांनी सभा गाजली. आजच्या ट्वीटनंतर आता पुन्हा एकदा शिवसेनाआकर्मक झालेली पहायला मिळाली.

हेही वाचा

 

 

Back to top button