Today Actor’s Photo : गाऊनमध्ये नोराचा कहर, रणबीर-आलियाचा किस, जीन्समध्ये बेडवर अनुष्का… पहा चर्चेतले हे फोटो

Today Actor’s Photo : गाऊनमध्ये नोराचा कहर, रणबीर-आलियाचा किस, जीन्समध्ये बेडवर अनुष्का… पहा चर्चेतले हे फोटो
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडच्या कॉरिडॉरमध्ये दररोज काही ना काही घडत असते. चाहते देखील त्यांच्या आवडत्या स्टार्सशी संबंधित अपडेट्स जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. प्रत्येक अभिनेत्री-अभिनेता सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी कनेक्ट राहतात. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आजच्या फोटोंमधून (Today Actor's Photo) आम्ही तुम्हाला काही सिनेकलाकारांचे दिवसभरातील अपडेट्स यामधून देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया 10 छायाचित्रांच्या माध्यमातून कोणत्या सेलिब्रिटीने आज काय अपडेट दिले आहे…

Today Actor's Photo : सोफी चौधरी

सोफी चौधरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो शेअर करत असते. आजही तीने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती पारंपरिक लूकमध्ये दिसून येत आहे. ऑफ शोल्डर ब्लाउजमधील सोफी लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. सोफीची ही स्टाईल चाहत्यांनाही पसंत पडत आहे.

करीना कपूर

करीना कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच, तीने तिच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. या छायाचित्रात करीना कपूर बॅग घेऊन उभी आहे. तिने तपकिरी रंगाचा ओव्हरकोट घातला आहे.

आलिया भट्ट

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच गुड न्यूज देणार आहेत. आज आलियाने तिच्या बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती संपूर्ण कुटुंबासह दिसत आहे. याशिवाय एका फोटोमध्ये रणबीर आलियाला किस करताना दिसत आहे.

दिशा पटानी

दिशा पटानी बऱ्याचदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते. पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिशाने तिचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती चष्मा घालून बसलेली दिसत आहे. दिशाच्या समोरच्या टेबलावर पॅनकेक देखील ठेवलेला दिसून येत आहे.

हिना खान

हिना खान पाश्चात्य आणि पारंपारिक अशा दोन्ही प्रकारच्या पोशाखांमध्ये खूपच सुंदर दिसते. या फोटोमध्ये तीने हिरव्या रंगाच्या सूटमध्ये दिसून येत आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे. ती प्रत्येक फोटोंमध्ये एकापेक्षा एक पोज देत आहे.

नोरा फतेही

नोरा फतेही तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. सिल्व्हर कलरच्या शिमरी गाऊनमध्ये नोराने तिचे फोटो शेअर केले आहेत. या थाई हाय स्लिट गाउनमध्ये नोराने तिच्या केसांचा बन बनवून लुक पूर्ण केला आहे.

वाणी कपूर

वाणी कपूरने तिचा स्पोर्ट्सवेअरमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती पांढऱ्या, पिवळ्या आणि काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट आणि स्पोर्ट्स ब्रामध्ये दिसत आहे. फोटोसोबत तीने ड्रॉप द बास्केटबॉल असे कॅप्शन लिहिले आहे.

अनुष्का सेन

सोशल मीडिया सेन्सेशन अनुष्का सेन बऱ्याचदा तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. ती पांढऱ्या क्रॉप टॉप आणि जीन्समध्ये बेडवर पोज देताना दिसत आहे. या फोटोंमध्ये अनुष्का खूपच क्यूट दिसून येत आहे.

मौनी रॉय

मौनी रॉय सध्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. एकापेक्षा एख पोजमधील फोटो ती सोशल मीडियावर न चूकता शेअर करत असते. सध्या तीने ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसून येत आहे. लाल लिपस्टिक आणि सोनेरी दागिन्यांसह मौनी या लूकमध्ये सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anushka Sen (@anushkasen0408)

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news