टोकियो; पुढारी ऑनलाईन : टोकिया पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू सुहास यतिराज आणि प्रमोद भगत यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. बॅडमिंटनपटू सुहास यतिराज आणि प्रमोद भगत यांच्या कामगिरीमुळे भारताची आणखी दोन पदके निश्चित झाली आहेत.
बॅडमिंटन एसएल-४ एकेरी स्पर्धेत सुहास यतिराज याने उपांत्य सामन्यात इंडोनेशियाचा खेळाडू सेतियावान फ्रेडी याला पराभव केला. तर प्रमोद भगत याने बॅडमिंटन एसएल-३ एकेरी स्पर्धेत उपांत्य फेरीत जपानच्या डी फुजिहारा याला २१-११ आणि २१-१६ अशी मात देत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
टोकिया पॅरालिम्पिकमध्ये आजचा ११ वा दिवस हा भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे. भारताचे खेळाडू नेमबाजी, बॅडमिंटन आणि ॲथलेटिक्समध्ये प्रदर्शन करण्यास सज्ज आहेत.
आतापर्यंत पॅरालिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पहिले सुवर्णपदक नोंदवण्याची संधी खेळाडूंना आहे.
शुकृवारी प्रवीणकुमारने उंच उडीत रौप्य पदक पटकावले होते. अवनी लेखारा हिने महिलांच्या ५० मीटर रायफल पी-३ स्पर्धेत कांस्य तर तिरंदाजीमध्ये हरविंदर सिंगने कास्य पदकावर मोहर उमटवली होती.
टोकिया पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत १४ पदकांवर मोहर उमटवली आहे. या स्पर्धेतील ही आजवरची
सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. भारतासाठी हे पॅरालिम्पिक विशेष ठरले आहे. आजपर्यंतच्या स्पर्धेत भारताला सर्वाधिक पदके ही टाोकियाे पॅरालिम्पिक स्पर्धेत मिळाले आहेत. सर्वच खेळाडूंनी विविध समस्यांवर मात करत पॅरालिम्पिकमध्ये आपले स्थान मिळवले आहे.
हेही वाचलं का ?